महिला IPL मध्ये खेळणार ५ संघ..! ‘या’ शहरांची नावं निश्चित; वाचा लिस्ट!

WhatsApp Group

Women’s Premier League : जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये आता महिलांच्या टूर्नामेंट संघांची संख्याही वाढवली जात आहे. नव्या मोसमात दाखल होणाऱ्या सर्व ५ संघांचे शहराचे नाव निश्चित झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी सांगितले की, संघांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. या पाच संघांमध्ये अहमदाबाद, मुंबई, बंगळुरू, दिल्ली आणि लखनऊच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

महिला आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या पाच संघांना खरेदी करण्यासाठी अनेक मोठ्या कंपन्यांनी बोली लावली होती. बिडिंग प्रक्रियेअंतर्गत बीसीसीआयने सर्व कंपन्यांना निविदा रक्कम पाठवण्यास सांगितले होते. २५ रोजी मंडळाने संघाच्या लिलावाचा निकाल जाहीर करण्याचे निश्चित केले होते.

हेही वाचा – फक्त २६ रुपयांमध्ये खरेदी करा Earbuds..! तोंडाला पाणी सुटेल अशी ऑफर; वाचा डिटेल्स!

अदानी समूहाने अहमदाबादसाठी बोली लावून संघाचे नाव निश्चित करण्यात यश मिळवले आहे. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची मालकी असलेल्या आरसीबीने, बंगळुरू संघाचा ताबा घेतला आहे.

पाहा संघ आणि त्यांचे मालक

  • JSW GMR क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेड – दिल्ली – ८१० कोटी
  • कपरी ग्लोबल होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड – लखनऊ – ७५७ कोटी
  • रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड – बंगळुरू – ९०१ कोटी
  • इंडियाविन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड – मुंबई – ९१२.९९ कोटी
  • अदानी स्पोर्ट्सलाइन प्रायव्हेट लिमिटेड – १२८९ कोटी

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment