भारत-नेदरलँड्स वर्ल्डकप मॅचदरम्यान BCCI नं घेतला ‘ऐतिहासिक’ निर्णय!

WhatsApp Group

BCCI On Match Fee : भारतीय क्रिकेटमध्ये मोठे बदल सुरू झाले आहेत. आता बीसीसीआयच्या केंद्रीय करारात समाविष्ट महिला क्रिकेटपटूंनाही पुरुषांच्या बरोबरीने मॅच फी मिळणार आहे. बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. बोर्डाचे सचिव जय शाह यांनी ट्वीट करून ही माहिती दिली.

जय शाह यांनी ट्वीट केले की, ‘मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की बीसीसीआयने भेदभाव नष्ट करण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलले आहे. बोर्डाने करार केलेल्या महिला क्रिकेटपटूंना समान वेतन देण्याचे धोरण आम्ही राबवत आहोत. आता महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंना समान मॅच फी मिळणार आहे. याद्वारे आपण क्रिकेटमधील स्त्री-पुरुष समानतेच्या नव्या युगात प्रवेश करत आहोत.

हेही वाचा – BRO Recruitment 2022 : ३०० हून अधिक पदांसाठी भरती..! ‘असं’ करा Apply

केंद्रीय करारामध्ये तफावत

बीसीसीआयने करारबद्ध महिला क्रिकेटपटूंना पुरुषांच्या बरोबरीने मॅच फी देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, दोन्ही वर्गांच्या केंद्रीय करारामध्ये अजूनही मोठी तफावत आहे. २०२१-२२ साठी बीसीसीआयने महिला क्रिकेटपटूंना तीन श्रेणींमध्ये करार दिले आहेत. २०२१-२२ हंगामासाठी बीसीसीआयकडून श्रेणी-A च्या खेळाडूंना ५० लाख, श्रेणी B च्या खेळाडूंना ३० लाख आणि C श्रेणीतील खेळाडूंना १० लाख रुपये मिळतील. त्याच वेळी, या कालावधीसाठी, बीसीसीआयने पुरुष खेळाडूंना चार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये केंद्रीय करार दिले आहेत. A+ श्रेणीतील खेळाडूंना ७ कोटी, A-श्रेणीतील खेळाडूंना ५ कोटी, श्रेणी-B मधील खेळाडूंना ३ आणि श्रेणी C मधील खेळाडूंना १ कोटी रुपये मिळतील.

Leave a comment