चाहत्याच्या कानफटात लगावली, क्रिकेटर शाकिब अल हसनचा व्हिडिओ व्हायरल!

WhatsApp Group

बांगलादेशात पुन्हा एकदा शेख हसीना यांच्यासाठी पंतप्रधानपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार शाकिब अल हसन यानेही आपल्या पक्षाकडून लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. मात्र, विजय मिळूनही तो एका वाईट कृतीमुळे चर्चेत आहे. एका व्हिडिओमध्ये तो एका चाहत्याला कानाखाली (Shakib Al Hasan Slapped A Fan) मारताना दिसत आहे. निवडणूक प्रचारादरम्यान ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

बांगलादेशच्या पश्चिम शहरातील मागुरा येथील मुख्य निवडणूक अधिकारी अबू नासेर बेग यांनी सांगितले की, 36 वर्षीय अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन, ज्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये देशाचे नेतृत्व केले आहे, त्याने त्याच्या मतदारसंघात आपल्या प्रतिस्पर्ध्याचा 150,000 मतांपेक्षा जास्त फरकाने पराभव केला.

शाकिब क्रिकेटच्या मैदानावरील वाईट वागणुकीमुळे आधीच खूप बदनाम आहे. अलीकडेच एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकादरम्यान श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने अँजेलो मॅथ्यूजला टाइमआऊट केले. अशाप्रकारे बाद होणारा अँजेलो हा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरला. शाकिबच्या कृतीवर बरीच टीका झाली पण तो डगमगला नाही. यावेळी त्याचा एक नवा व्हिडिओ त्याची बदनामी करत आहे. निवडणुकीदरम्यान तो गर्दीत अडकला आणि एका चाहत्याला त्याच्यासोबत सेल्फी घ्यायचा असतो. रागाच्या भरात शाकिबने चाहत्याला कानाखाली मारून बाजूला ढकलले.

हेही वाचा – IAS अधिकारी नृपेंद्र मिश्रा, ज्यांच्या देखरेखीखाली बनलंय राम मंदिर

निवडणूक प्रचारादरम्यानही लोकप्रतिनिधी आणि क्रिकेटचा कर्णधार म्हणून आपली जबाबदारी चोख पार पाडता येईल का, असा प्रश्न विचारला असता, शाकिब उत्तर देताना संतप्त झाला. “मी निवृत्त झालो आहे का? मी निवृत्त झालो नाही, तर हा प्रश्न आला कुठून?”, असे त्याने रागाच्या भरात उत्तर दिले.

शाकिब हा एकमेव क्रिकेटपटू आहे ज्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकाच वेळी नंबर वन अष्टपैलू म्हणून स्थान दिले आहे. 2006 साली शाकिब 19 वर्षांचा असताना त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment