BAN vs SL : श्रीलंकेचा वर्ल्डकपला राम राम, बांगलादेश जिंकली पण…

WhatsApp Group

BAN vs SL World Cup 2023 In Marathi : दिल्लीत रंगलेल्या वर्ल्डकपच्या नाट्यमय सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेचा 3 गडी राखून पराभव केला. अँजेलो मॅथ्यूजच्या ‘टाइम-आऊट’ मुळे रंगतदार झालेल्या सामन्यात बांगलादेशने प्रथम टॉस जिंकून श्रीलंकेला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. चरिथ असलांकाच्या शतकी खेळीच्या जोरावर लंकेने बांगलादेशला 280 धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात नजमुल हसन शांतो आणि कर्णधार शाकिब अल हसनच्या अर्धशतकांच्या जोरावर बांगलादेशने 42व्या ओव्हर्समध्ये विजय आपल्या नावावर केला. आता टाइम-आऊटचे दुखणे घेऊन श्रीलंकेचा संघ वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. त्याचवेळी चाहत्यांनी शाकिबच्या या कृतीबद्दल सोशल मीडियावर टीका केली.

श्रीलंकेचा अनुभवी खेळाडू अँजेलो मॅथ्यूज वादग्रस्त निर्णयाचा बळी ठरला. फलंदाजीला येताना अतिरिक्त वेळ घेतल्याने त्याला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवण्यात आले. मॅथ्यूजविरुद्ध शाकिबने अपील केले आणि पंचांनी नियमानुसार बाद ठरवले. बांगलादेशच्या फलंदाजीदरम्यान मॅथ्यूजने शाकिबला बाद केले, तेव्हा त्यानेही उत्तर दिले. लंकेकडून चरिथ असलांकाने उत्कृष्ट शतकी खेळी साकारली. त्याने 6 चौकार आणि 5 षटकारांसह 108 धावा केल्या. बांगलादेशकडून तन्झीम हसन शाकिबने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. शोरफुल इस्लाम आणि शाकिब अल हसनला 2 विकेट्स मिळाल्या.

हेही वाचा – बँकेत जॉब मिळवण्याची संधी! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरती, वाचा डिटेल्स

बांगलादेशकडून उत्कृष्ट फलंदाजी

280 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेश संघाने चांगली सुरुवात केली. मात्र, सलामीवीर 50 धावांच्या आत बाद झाले. पण यानंतर शाकिब अल हसन आणि नझमुल हसन शांतो पूर्णपणे क्रीजवर स्थिरावले. दोन्ही फलंदाजांमध्ये शतकी भागीदारी पाहायला मिळाली. शाकिबने 12 चौकार आणि 2 षटकारांसह 82 तर शांतोने 12 चौकारांसह 90 धावा केल्या. अँजेलो मॅथ्यूजने दोघांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला संघाला. यानंतर बांगलादेशचा संघ डळमळताना दिसत होता. मात्र, अखेरीस बांगलादेशने या सामन्यात 3 गडी राखून रोमहर्षक विजयाची नोंद केली.

विश्वचषकातून बाहेर पडणारा पहिला संघ बांगलादेश होता. पण आता उपांत्य फेरीतील श्रीलंकेच्या आशा पूर्णतः संपुष्टात आल्या आहेत. या मेगा स्पर्धेत दोन्ही संघ आता प्रत्येकी एक सामना खेळणार आहेत. श्रीलंकेचा पुढील सामना न्यूझीलंडशी तर बांगलादेशचा ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment