विश्वविजेत्या कॅप्टनची निवृत्ती..! टी-२० वर्ल्डकपपूर्वी घेतला धक्कादायक निर्णय

WhatsApp Group

Aaron Finch Retirement : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू आणि कर्णधार आरोन फिंचनं निवृत्ती जाहीर केली आहे. तो न्यूझीलंडविरुद्ध १४६वा आणि शेवटचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. मात्र पुढील महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात तो ऑस्ट्रेलियाचं कर्णधारपद सांभाळेल. त्यानं कर्णधारपद सोडताच चाहत्यांना मोठा झटका बसला आहे.

फिंचचं विधान

आरोन फिंचनं आपल्या विधानात म्हटलं आहे, ”आतापर्यंतचा प्रवास अप्रतिम होता. काही सर्वोत्तम एकदिवसीय संघांचा भाग होण्याचं भाग्य मला लाभलं आहे. मी ज्यांच्यासोबत क्रिकेट खेळलो त्या सर्वांचा मला आशीर्वाद मिळाला आहे. आता पुढच्या कर्णधाराला तयारी करण्याची आणि विश्वचषक जिंकण्याची संधी देण्याची वेळ आली आहे. ज्यांनी मला इथपर्यंत पोहोचण्यास मदत केली त्या सर्वांचं मी आभार मानतो.” आरोन फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियानं गेल्या वर्षी टी-२० विश्वचषक जिंकला होता.

हेही वाचा – IND Vs AFG : “हा शुद्ध हिंदीत बोलतोय..!”, रोहित शर्माचा प्रश्न ऐकून विराट अवाक्; पाहा मुलाखतीचा VIDEO

फिंच अतिशय खराब फॉर्मशी झुंज देत आहे. गेल्या काही काळापासून त्याच्याकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये मोठी खेळी झालेली नाही, त्यानं गेल्या सात डावात २६ धावा केल्या आहेत. त्याला त्याच्या नावानुसार कामगिरी करता आलेली नाही. फिंचनं २०२३ मध्ये भारतात होणारा एकदिवसीय विश्वचषक आपलं लक्ष्य असल्याचं सांगितलं होतं, परंतु खराब फॉर्ममुळे त्याला निवृत्ती घ्यावी लागली.

हेही वाचा – योयो हनी सिंगकडून ‘मनी’ घेत घटस्फोट..! बायकोला मिळणार ‘इतक्या’ कोटींची पोटगी; वाचा!

आरोन फिंचची कारकीर्द

आरोन फिंचने ऑस्ट्रेलिया संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. त्यानं ऑस्ट्रेलियासाठी १४५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५४०१ धावा केल्या आहेत ज्यात १७ शतकांचा समावेश आहे. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी चौथा सर्वाधिक शतक झळकावणारा फलंदाज आहे. रिकी पाँटिंगच्या नावापुढं २९ शतकं आहेत, डेव्हिड वॉर्नर आणि मार्क वॉ यांनी १७-१७ शतकं केली आहेत. याशिवाय फिंचनं आयपीएलमध्ये ९२ सामने खेळून २०९१ धावा केल्या आहेत. त्यानं आयपीएलमध्ये १५ अर्धशतकं झळकावली आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment