मुलगा ९ महिन्यांचा झाल्यानंतर ‘दिग्गज’ क्रिकेटरनं केलं लग्न! पाहा PHOTO

WhatsApp Group

मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्सनं न्यू साउथ वेल्स राज्यातील किनारी शहर बार्यान बे येथे त्याची गर्लफ्रेंड बेकी बोस्टनशी लग्न केलं आहे. या जोडप्याला ९ महिन्यांचा मुलगा देखील आहे, त्याचं नाव अल्बी आहे. दोघांनी जून २०२० मध्ये साखरपुडा केला होता. या लग्नात कुटुंबीयांव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियन क्रिकेटर नॅथन लायन आणि त्याची पत्नी एम्मा मॅकार्थी देखील उपस्थित होते. त्याचवेळी ट्रॅव्हिस हेडनंही पत्नीसोबत लग्नाला हजेरी लावली.

बायर्न-बे इथं कमिन्स-बेकीनं लग्न केलेलं ठिकाण ही प्रीमियम मालमत्ता आहे आणि एका रात्रीचं भाडं सात हजार डॉलर्सपेक्षा जास्त आहे. या बंगल्यात स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट आणि चार बेडरुम्स व्यतिरिक्त भरपूर गेस्ट रूम्स आहेत. हे तेच ठिकाण आहे जिथे हॉलिवूडचा सुपरस्टार मॅट डेमननं कोरोनाची लागण झाल्यानंतर या वर्षी जानेवारीमध्ये त्याचा क्वारंटाइन कालावधी घालवला होता.

पॅट कमिन्सची लव्हस्टोरी!

कमिन्स आणि बेकी यांची पहिली भेट २०१३ मध्ये झाली होती आणि पहिल्याच भेटीत कमिन्स बेकीवर भाळला होता आणि हळूहळू त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. बेकी ही यूकेच्या यॉर्कशायर शहराची आहे. क्रिकेटमध्ये ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाचे वैर सर्वश्रुत आहे. पण, ही गोष्ट त्यांच्या नात्यात कधीच आली नाही. बेकी आणि कमिन्समध्ये केवळ सीमा अंतर नाही तर वयातही मोठं अंतर आहे. बेकी कमिन्सपेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे. पॅट कमिन्सचा जन्म ८ मे १९९३ रोजी झाला होता, तर बेकीचा जन्म १७ नोव्हेंबर १९९० रोजी झाला होता.

हेही वाचा – CWG 2022 : “आता माझ्या बाबांनी पानाचं दुकान चालवायचं नाही”, सांगलीचा मेडलिस्ट संकेत सरगरची इच्छा!

कमिन्सनं बेकीला ६ वर्षे डेट केल्यानंतर २०२० मध्ये तिला लग्नासाठी प्रपोज केलं. त्यानं बेकीला ज्या पद्धतीनं प्रपोज केलं ते पाहून ती देखील थक्क झाली. कमिन्सनं एका मुलाखतीत सांगितले होतं, की त्यानं त्याला पिकनिक स्पॉटवर नेलं होतं आणि शॅम्पेनची बाटली काढून गुडघ्यावर बसून फिल्मी स्टाईलमध्ये लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. त्याच वर्षी दोघांचीही एंगेजमेंट झाली. कमिन्स आणि बेकी एकावर्षापूर्वी लग्न करणार होते. पण, कोरोनामुळे दोघांनी लग्न केलं नाही. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कमिन्स बाबा झाला. बेकीने ८ ऑक्टोबर रोजी गोंडस मुलाला जन्म दिला.

गेल्या डिसेंबरमध्ये टिम पेनच्या जागी कमिन्सला ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार बनवण्यात आलं होतं. सेक्सटिंगच्या वादामुळे पेनला कर्णधारपद गमवावं लागलं. कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियानं अॅशेस मालिकेत इंग्लंडचा ४-० असा पराभव केला.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment