VIDEO : 14 चौकार, 9 षटकार…पाकिस्तानविरुद्ध डेव्हिड वॉर्नर ‘झुकेगा नहीं साला’!

WhatsApp Group

David Warner Pushpa Celebration : वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (AUS vs PAK) यांच्यात सामना सुरू आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यावर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानची धुलाई केली. डावखुरा स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नरने शानदार शतक झळकावून पाकिस्तानच्या गोलंदाजांना ठोकले. आपले शतक साजरे करताना त्याने ‘मै झुकेगा नहीं साला’ ही पुष्पा चित्रपटामधील स्टाईलही केली.

वॉर्नरचा एक ताजा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये वॉर्नर ‘पुष्पा’ स्टाईलमध्ये शतक साजरे करताना दिसत आहे. वॉर्नरने सुरुवातीपासूनच पाकिस्तानी गोलंदाजांवर नियंत्रण ठेवले आणि स्टाईलने शतक झळकावून ऑस्ट्रेलियन संघाला मजबूत स्थितीत आणले. 43.2 व्या षटकात हारिस रौफला मोठा फटका खेळताना वॉर्नर झेलबाद झाला. त्याने 14 चौकार आणि 9 षटकारांसह 163 धावांची खेळी केली.

हेही वाचा – उत्तर प्रदेशमध्ये महिला पोलिसांकडून पहिला एन्काउंटर!

डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श या सलामीवीरांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाची तुफानी सुरुवात केली. शाहिन आफ्रिदीने टाकलेल्या पाचव्या षटकात वॉर्नर आऊट झाला असता, पण मिड ऑनला उभ्या असलेल्या उसामा मीरने त्याचा सोपा झेल सोडला. याचा फायदा वॉर्नरने पुरेपूर उठवला. वॉर्नर आणि मार्श यांनी पहिल्या गड्यासाठी 259 धावांची विक्रमी भागीदारी रचली. 34व्या षटकात मार्श बाद झाला. मार्शने 10 चौकार आणि 9 षटकारांसह 121 धावांची खेळी केली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथ (7), ग्लेन मॅक्सवेल (0), जोस इंग्लिस (13) यांना स्वस्तात गमावले.

दोन्ही संघांची Playing 11 (AUS vs PAK World Cup 2023)

ऑस्ट्रेलिया – डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीवन स्मिथ, मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मैक्सवेल, मार्कस स्टोइनिस, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कप्तान), एडम झाम्पा, जोश हेजलवुड.

पाकिस्तान – अब्दुल्ला शफीक, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, मोहम्मद नवाज, इफ्तिखार अहमद, उसामा मीर, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment