4,4,6,6,6 ग्लेन मॅक्सवेलने ठोकले वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक!

WhatsApp Group

Glenn Maxwell Fastest Century In Marathi : ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावले आहे. मॅक्सवेलने आयसीसी विश्वचषक 2023 (World Cup 2023)च्या 24व्या सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध (AUS vs NED) ही कामगिरी केली. मॅक्सवेलने अवघ्या 40 चेंडूत शतक झळकावले. यावेळी त्याने याच विश्वचषकात 49 चेंडूत विक्रमी शतक झळकावणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करामचा विश्वविक्रम मोडला.

एडन मार्करामने यापूर्वी चालू विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध 49 चेंडूत शतक झळकावले होते. याआधी आयर्लंडचा माजी फलंदाज केविन ओब्रायनने 2011 मध्ये इंग्लंडविरुद्ध विश्वचषकात 50 चेंडूत शतक झळकावले होते. 2015 मध्ये मॅक्सवेलने श्रीलंकेविरुद्ध 51 चेंडूत शतक पूर्ण केले होते. २०१५ च्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सनेही 52 चेंडूत शतक झळकावले होते.

हेही वाचा – वॉर्नरची सचिनच्या महाविक्रमाशी बरोबरी, पाँटिंगला ढकलले मागे!

डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या वादळी शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्ससमोर 50 षटकात 8 बाद 399 धावा उभ्या केल्या. दिल्लीत रंगणाऱ्या सामन्यात वॉर्नरने 11 चौकार आणि 3 षटकारांसह 104 धावा केल्या. तर मॅक्सवेलने 44 चेंडूत 9 चौकार आणि 8 षटकारांसह 106 धावांची खेळी केली. या दोघांशिवाय स्टीव्ह स्मिथने 71 आणि मार्नस लाबुशेनने 62 धावांची खेळी करत योगदान दिले. नेदरलँड्सकडून व्हॅन बीकने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment