AUS vs AFG World Cup 2023 In Marathi : वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी उत्सुक असलेल्या अफगाणिस्तानला इतिहास रचण्याची संधी आहे. मुंबईच्या वानखेडेवर सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 291 धावा केल्या आहेत. सलामीवीर बॅटर इब्राहिम झादरानने आपल्या देशासाठी वर्ल्डकपमध्ये पहिलेवहिले शतक साजरे केले. अष्टपैलू खेळाडू राशिद खानने शेवटच्या षटकात आतषबाजी फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाचे दुखणे वाढवले.
अफगाणिस्तानची सर्वात मोठी धावसंख्या
रहमानुल्लाह गुरबाझ आणि इब्राहिम झादरानने पहिल्या विकेटसाठी 38 धावा केल्या. जोश हेझलवूडला मोठा फटका खेळण्याच्या नादात गुरबाझ वैयक्तिक 21 धावांवर बाद झाला. त्यानंतर रहमत शाहने झादरानला साथ दिली. रहमत (30) बाद झाल्यावर कप्तान हाश्मतुल्लाह शाहिदीने (26) थोडा वेळ किल्ला लढवला. अफगाणिस्तानच्या प्रत्येक बॅटरने आपली जबाबदारी ओळखून धावा जमवल्या. मोहम्मद नबी (12) बाद झाल्यावर राशिद खानने जोरकस फटकेबाजी केली. त्याने 18 बॉलमध्ये 2 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 35 धावा केल्या. झादरानने नाबाद 129 धावांची (8 चौकार आणि 3 षटकार) जबरदस्त इनिंग खेळली. अफगाणिस्तानने 50 षटकात 5 बाद 291 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून हेझलवूडने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. अफगाणिस्तानची ही वर्ल्डकपमध्ये सर्वात मोठी धावसंख्या ठरली.
सचिनचा मी आभारी आहे – झादरान
”काल सचिन तेंडुलकर सरांशी माझ्या छान गप्पा झाल्या, त्यांनी बरेच अनुभव शेअर केले जे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. त्यांचे अनुभव शेअर केल्याबद्दल आणि मला खूप आत्मविश्वास दिल्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे”, असे झादरानने शतकानंतर सांगितले.
हेही वाचा – टाटा विकणार ‘ही’ कंपनी? गुंतवणूकदारांमध्ये गोंधळ, शेअर्समध्ये घसरण!
ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत खेळलेल्या 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तर अफगाणिस्तानचा संघ 7 पैकी 4 सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. सामना 2 वाजता सुरू होईल तर नाणेफेक 1.30 वाजता होणार आहे. ऑस्ट्रेलियानेने अफगाणिस्तानवर मात केल्यास ते विक्रमी 9व्यांदा सेमीफायनलमध्ये पोहोचतील. अफगाणिस्तानला सेमीफायनलमध्ये जायचे असेल तर आज ऑस्ट्रेलियाला आणि पुढच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवावे लागेल.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!