ग्लेन मॅक्सवेलचा मुंबईत चमत्कार, 21 चौकार आणि 10 षटकारांचा पाऊस!

WhatsApp Group

AUS vs AFG World Cup In Marathi : ऑस्ट्रेलियाची 7 बाद 91 अशी अवस्था असताना ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेलने नाबाद 201 धावांची झुंजार इनिंग खेळत अफगाणिस्तानच्या तोंडचा विजयी घास हिरावून घेतला. दोन जीवदानांचा फायदा उठवत मॅक्सवेलने कप्तान पॅट कमिन्ससोबत सातव्या गड्यासाठी 202 धावांची विक्रमी भागीदारी रचली. यात कमिन्सने 68 चेंडूंचा सामना करत 12 धावा केल्या. मॅक्सवेलने 128 चेंडूंच्या या इनिंगमध्ये 21 चौकार आणि 10 षटकारांचा पाऊस पाडला. मॅक्सवेलच्या या अविश्वसनीय बॅटिंगमुळे ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले आहे.

ऑस्ट्रेलियासाठी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या (वनडे)

201* – ग्लेन मॅक्सवेल वि अफगाणिस्तान, मुंबई वानखेडे, 2023 WC
185* – शेन वॉटसन वि बांगलादेश, मीरपूर, 2011
181* – मॅथ्यू हेडन विरुद्ध न्यूझीलंड, हॅमिल्टन, 2007
179 – डेव्हिड वॉर्नर विरुद्ध पाकिस्तान, अॅडलेड, 2017
178 – डेव्हिड वॉर्नर विरुद्ध अफगाणिस्तान, पर्थ, 2015 WC

अफगाणिस्तानकडून मोठी धावसंख्या

अफगाणिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना 291 धावा केल्या. सलामीवीर बॅटर इब्राहिम झादरानने आपल्या देशासाठी वर्ल्डकपमध्ये पहिलेवहिले शतक साजरे केले. रहमानुल्लाह गुरबाझ आणि इब्राहिम झादरानने पहिल्या विकेटसाठी 38 धावा केल्या. जोश हेझलवूडला मोठा फटका खेळण्याच्या नादात गुरबाझ वैयक्तिक 21 धावांवर बाद झाला. त्यानंतर रहमत शाहने झादरानला साथ दिली. रहमत (30) बाद झाल्यावर कप्तान हाश्मतुल्लाह शाहिदीने (26) थोडा वेळ किल्ला लढवला. अफगाणिस्तानच्या प्रत्येक बॅटरने आपली जबाबदारी ओळखून धावा जमवल्या. मोहम्मद नबी (12) बाद झाल्यावर राशिद खानने जोरकस फटकेबाजी केली. त्याने 18 बॉलमध्ये 2 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 35 धावा केल्या. झादरानने नाबाद 129 धावांची (8 चौकार आणि 3 षटकार) जबरदस्त इनिंग खेळली. अफगाणिस्तानने 50 षटकात 5 बाद 291 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून हेझलवूडने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. अफगाणिस्तानची ही वर्ल्डकपमध्ये सर्वात मोठी धावसंख्या ठरली.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment