VIDEO : 43 वर्षाच्या रोहन बोपण्णाने रचला इतिहास! ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली, पाहा तो क्षण

WhatsApp Group

भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णा (Rohan Bopanna) याने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया ओपनचे विजेतेपद (AUS Open 2024) पटकावले आहे. त्याने मॅथ्यू एबडेनसह शनिवारी ऑस्ट्रेलियन ओपन 2024 च्या पुरुष दुहेरीची अंतिम फेरी जिंकली. 43 वर्षीय बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार एबडेन यांनी इटलीच्या सिमोन बोलेली आणि अँड्रिया वावसोरी यांचा 7-6, 7-5 असा पराभव करून इतिहास रचला. बोपण्णाच्या कारकिर्दीतील हे पहिले पुरुष दुहेरीचे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. त्याने एकूण दोन ग्रँडस्लॅम जेतेपदांवर कब्जा केला आहे. त्याने यापूर्वी 2017 मध्ये कॅनडाच्या गॅब्रिएला डॅब्रोव्स्कीसोबत फ्रेंच ओपन मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते. या विजयानंतर बोपण्णाने पत्नीचे आणि समर्थकांचे आभार मानले.

बोपण्णा ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर पुरुष खेळाडू ठरला आहे. त्याने जीन ज्युलियन रॉजरचा विक्रम मोडला आहे. नेदरलँडच्या जीनने 2022 मध्ये 40 वर्षे 9 महिने वयाच्या फ्रेंच ओपन पुरुष दुहेरीचे विजेतेपद जिंकले. फायनल जिंकल्यानंतर बोपण्णाने एबडेनचे कौतुक केले. पुरुष दुहेरीचे ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकणारा तो तिसरा भारतीय ठरला आहे. तो म्हणाला, “मी 43 वर्षांचा नाही, तर 43 लेव्हलचा आहे आणि माझ्या अद्भुत ऑस्ट्रेलियन जोडीदाराशिवाय हे शक्य झाले नसते.” बोपण्णा 2013 आणि 2023 मध्ये यूएस ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचला होता पण तो विजेतेपदाला मुकला होता.

हेही वाचा – Salary Slip मध्ये काय काय असतं? ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या!

मेलबर्न पार्कमधील रॉड लेव्हर एरिना येथे द्वितीय मानांकित बोपण्णा-एब्डेन यांचा सामना इटालियन जोडीशी झाला. भारत-ऑस्ट्रेलियन जोडीने फायनल सरळ सेटमध्ये जिंकली असली तरी त्यांना कडवी झुंज द्यावी लागली. बोपण्णा-एबडेन हे बिगरमानांकित जोडीविरुद्ध लवकर यश मिळवण्यासाठी हताश होते आणि बॅक-टू-बॅक गेममध्ये ब्रेक पॉइंटच्या संधी निर्माण केल्या परंतु दोन्ही प्रसंगी सुरुवातीचा सेट टायब्रेकमध्ये गेला. भारत-ऑस्ट्रेलियन जोडीने एकही टायब्रेकर गमावला नाही. बोपण्णा-एब्डेन यांनी चेक रिपब्लिकच्या टॉमस मखाच आणि चीनच्या झांग झिझेन यांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment