Asian Games 2023 Final INDW vs SLW : भारतीय महिला क्रिकेट संघाने 2023 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. भारताने प्रथमच सुवर्णपदकावर कब्जा केला. हँगझोऊ येथील पिंगफेंग कॅम्पस क्रिकेट मैदानावर सोमवारी भारताने श्रीलंकेचा 19 धावांनी पराभव केला. भारताने 117 धावांचे लक्ष्य ठेवले आणि प्रत्युत्तरात श्रीलंकेने निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 97 धावा केल्या. श्रीलंकेकडून हसिनी परेराने (25) सर्वाधिक धावा केल्या. नीलाक्षी डी सिल्वाने 23 आणि ओशादी रणसिंघेने 19 धावांचे योगदान दिले. हे तिघे वगळता श्रीलंकेच्या इतर खेळाडूंना 15 चा आकडाही पार करता आला नाही. कर्णधार चमारी अटापट्टू फक्त 12 धावा करू शकली आणि अनुष्का संजीवनी फक्त 1 धाव करू शकली. भारताकडून तितास साधूने तीन तर राजेश्वरी गायकवाडने दोन गडी बाद केले. दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकार आणि देविका वैद्य यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून भारताने 7 गडी गमावून 116 धावा केल्या होत्या. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची (Asian Games 2023 Final) सुरुवात चांगली झाली नाही. शफाली वर्मा वैयक्तिक 9 धावांवर बाद झाली. यानंतर स्मिती मंधाना आणि जेमिमाह रॉड्रिग्स यांनी डावाची धुरा सांभाळली आणि दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली. भारताला 89 धावांवर दुसरा धक्का बसला कारण मंधाना 46 धावांवर बाद झाली. मंधाना बाद झाल्यानंतर भारतीय संघाची दुरवस्था झाली, रिचा घोष 9, कर्णधार हरमनप्रीत कौर 2 आणि पूजा वस्त्राकर 2 धावांवर बाद झाली. दुसऱ्या टोकाला फलंदाजी करत असलेली जेमिमाही अखेरच्या षटकात मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात 42 धावांवर आपली विकेट गमावून पॅव्हेलियनमध्ये परतली.
हेही वाचा – Rules Changing From 1 October : 1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम!
दोन्ही संघांची Playing 11 (Asian Games 2023 Final)
भारत – स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कप्तान), ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, देविका वैद्य, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, तितास साधू, राजेश्वरी गायकवाड.
श्रीलंका – चमारी अटापट्टू (कर्णधार), अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), विशामी गुणरत्ने, निलाक्षी डी सिल्वा, हसिनी परेरा, उदेशिका प्रबोधिनी, ओशादी रणसिंघे, इनोका रणवीरा, इनोशी प्रियदर्शिनी, कविशा दिलहारी, सुगंधिका कुमारी.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!