VIDEO : भारत-पाकिस्तान मॅचमध्ये अक्षरश: Goosebumps, आख्ख्या स्टेडियमने गायलं ‘वंदे मातरम’!

WhatsApp Group

Asian Champions Trophy : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 मध्ये बुधवारी भारताने पाकिस्तानच्या संघाचा 4-0 असा पराभव केला. यासह पाकिस्तान संघाचे उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले. आता पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. सामना सुरू होण्यापूर्वी संपूर्ण स्टेडियम वंदे मातरमच्या जयघोषाने गुंजू लागल्याने विलोभनीय दृश्य पाहायला मिळाले.

भारत-पाकिस्तान यांच्या या महासामन्यात संपूर्ण स्टेडियम वंदे मातरमने गुंजू लागले. जेव्हा स्पीकरमध्ये वंदे मातरम वाजवले गेले, तेव्हा सर्व भारतीय चाहते उभे राहिले. सर्व प्रेक्षकांनीही आपापल्या फोनचा टॉर्च चालू केला. हे दृश्य फारच पाहण्यासारखे होते. हा खरोखरच भावनिक व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ हॉकी इंडियाने ट्विटरवर पोस्ट केला आहे. जो खूप वेगाने व्हायरल होत आहे.

हेही वाचा – VIDEO : चंद्रावर गाडी चालवणारा पहिला माणूस! ‘अशी’ धावली होती ‘Moon Buggy’

भारताने हा सामना 4-0 ने जिंकला. कर्णधार हरमनप्रीतच्या 2 पेनल्टी कॉर्नरच्या गोलच्या जोरावर टीम इंडियाला उपांत्य फेरी गाठता आली. सामना सुरू झाल्यानंतर काही वेळातच भारताने पहिला गोल केला. पाकिस्तानचा संघ सुरुवातीला चांगल्या लयीत दिसत होता. पण नंतर पाकिस्तान संघाच्या आत्मविश्वासाला सातत्याने तडा जाताना दिसला. यानंतर पहिल्या हाफमध्येही पाकिस्तान 2-0 ने मागे राहिला.

आकाशदीपने चौथ्या क्वार्टरमध्ये भारतासाठी एक गोल केला. नीलकांतने चमकदार चाल करत वर्तुळाच्या डाव्या बाजूने चेंडू मनदीपकडे दिला. मनदीपने पाकिस्तानच्या दोन खेळाडूंना चकवले आणि गोलपोस्टजवळ उभ्या असलेल्या आकाशदीपकडे पास केला, ज्याने त्याच्यावर गोल करण्यात कोणतीही चूक केली नाही. आता उपांत्य फेरीत भारताचा सामना जपानशी होणार आहे. जपानने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment