SL vs PAK : आशिया कप फायनलमधून भारतीय चाहत्यांना स्टेडियमबाहेर काढलं? पाहा VIDEO

WhatsApp Group

Asia Cup Final 2022 SL vs PAK : भानुका राजपक्षेची उत्कृष्ट फलंदाजी आणि प्रमोद मधुशनच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळं श्रीलंका आशिया कप २०२२ स्पर्धेचा चॅम्पियन बनला. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेनं पाकिस्तानचा २३ धावांनी पराभव केला. श्रीलंकानं सहाव्यांदा स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. प्रथम खेळताना श्रीलंकानं भानुका राजपक्षेच्या नाबाद ७१ धावांच्या जोरावर ६ बाद १७० धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ २० षटकांत १० गडी गमावून १४७ धावाच करू शकला. २०१२ नंतर जेतेपद पटकावण्याची पाकिस्तानला चांगली संधी होती. मात्र संघाला त्यात अपयश आलं.

सामन्यादरम्यान एक मोठा वाद पाहायला मिळाला. टीम इंडियाची जर्सी घातल्यामुळं स्टेडियमबाहेर करण्यात आल्याचा दावा भारतीय चाहत्यांनी केला आहे. याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ टॅग करताना भारत आर्मीनं आयसीसी आणि आशिया क्रिकेट काऊन्सिलला विचारलं, की आम्ही तुम्हाला चौकशीची विनंती करतो, कारण आमचे सदस्य भारतातून आले आहेत. त्यांना स्थानिक अधिकारी आणि पोलिसांनी स्टेडियममध्ये प्रवेश करता येणार नसल्याचं सांगितलं. एकदम धक्कादायक निर्णय. यावर चाहतेही संताप व्यक्त करत आहेत आणि या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत आहेत.

हेही वाचा – शिक्षक आहे की हैवान..? ८ वर्षाच्या विद्यार्थ्यावर फेकलं उकळतं पाणी! वाचा कारण

पाकिस्तानचा संघ कोसळला!

श्रीलंकेच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार बाबर आझमला केवळ ५ धावा करता आल्या. त्याचवेळी फखर जमान शून्यावर बाद झाला. प्रमोद मधुशननं दोघांची विकेट घेतली. यानंतर रिझवान आणि इफ्तिखार अहमद यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सांभाळला. ३१ चेंडूत ३२ धावा करून इफ्तिखार मधुशनचा तिसरा बळी ठरला. त्यानंतर नवाज ९ चेंडूत ६ धावा काढून चमिका करुणारत्नेचा बळी ठरला.

पाकिस्तानला शेवटच्या ५ षटकात ७० धावा करायच्या होत्या आणि ७ विकेट्स हातात होत्या. १६व्या षटकात वेगवान गोलंदाज चमिका करुणारत्नेनं केवळ ९ धावा दिल्या आणि नवाजची विकेटही घेतली. १७वे षटक लेगस्पिनर वनिंदू हसरंगानं टाकले आणि ३ बळी घेतले. त्यानं पहिल्याच चेंडूवर रिझवानला बाद केलं. त्यानं ४९ चेंडूत ५५ धावा केल्या. ४ चौकार आणि एक षटकार मारला. तिसऱ्या चेंडूवर आसिफ अली शून्यावर बाद झाला. हसरंगानं ४ षटकात २७ धावा देत ३ बळी घेतले.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment