

Asia Cup 2023 : आशिया चषक 2023 ची भारतीय क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ही स्पर्धा आजपासून ठीक 10 दिवसांनी सुरू होणार आहे, ज्यासाठी अद्याप भारतीय संघ जाहीर झालेला नाही. आशिया चषक स्पर्धेसाठी भारताचा संघ 21 ऑगस्टला जाहीर होणार आहे. दरम्यान, पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आशिया चषकासाठी हार्दिक पांड्याला नाही, तर जसप्रीत बुमराहला उपकर्णधार बनवले जाऊ शकते. हा
खरं तर, सध्या भारत आणि आयर्लंड (IND vs IRE) यांच्यात तीन सामन्यांची T20 मालिका खेळली जात आहे, ज्यासाठी जसप्रीत बुमराहला भारताचा कर्णधार बनवण्यात आले आहे. बुमराह दुखापतीनंतर तंदुरुस्त आहे आणि शानदार पुनरागमनानंतर नवीन जबाबदारी स्वीकारण्यास सज्ज आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जसप्रीत बुमराहला आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त केले जाऊ शकते.
अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, जर आपण नेतृत्वाच्या दृष्टीने पाहिले तर बुमराहला पांड्यापेक्षा जास्त अनुभव आहे. बुमराहने 2022 मध्ये कसोटी संघाचे नेतृत्व केले आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये पांड्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उपकर्णधाराची भूमिका चमकदारपणे बजावली.
हेही वाचा – शरद पवारांच्या सहकाऱ्यावर ईडीची कारवाई, 1 कोटी रोकड आणि 25 कोटींचे सोने जप्त!
आशिया चषकासाठी बुमराहला रोहितचा उपकर्णधार बनवले तर धक्कादायक बाब ठरणार नाही, कारण त्यामागे एक कारण असेल. यामुळे आयर्लंड मालिकेदरम्यान रुतुराजच्या जागी बुमराहकडे कर्णधारपद सोपवण्यात आले होते.
हार्दिक पांड्याने IPL 2022 च्या पदार्पणाच्या मोसमात कर्णधार म्हणून गुजरात टायटन्सला ट्रॉफी जिंकून दिली होती. यानंतर, तो पुढच्या हंगामात म्हणजे 2023 मध्ये उपविजेता ठरला.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!