Asia Cup 2023 : भारत-पाकिस्तान सामना रद्द होण्याची 90% शक्यता!

WhatsApp Group

Asia Cup 2023 IND vs PAK : आशिया चषक 2023च्या नव्या मोसमाची पाकिस्तानने धमाकेदार सुरुवात केली. कर्णधार बाबर आझमनेही शतकी खेळी खेळली. स्पर्धेच्या 16व्या मोसमातील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेपाळवर 238 धावांनी मोठा विजय नोंदवला. आशिया चषकातील धावांच्या बाबतीत पाकिस्तानचा हा सर्वात मोठा विजय आहे. बाबर आझम आणि इफ्तिखार अहमद यांच्या शतकांच्या जोरावर पाकिस्तानने सामन्यात प्रथम खेळताना 342 धावांची मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात नेपाळचा संघ 104 धावांवर गारद झाला. लेगस्पिनर शादाब खानने 4 बळी घेतले. आता पाकिस्तानला गट फेरीतील शेवटच्या सामन्यात 2 सप्टेंबरला टीम इंडियाचा सामना करायचा आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे.

शनिवार, 2 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कँडी, श्रीलंकेत होणार आहे. या दिवशी पावसाची 90 टक्के शक्यता आहे. अशा परिस्थितीत सामना रद्दही होऊ शकतो. याचा फायदा पाकिस्तान आणि बाबर आझम या दोघांना होणार आहे. Weather.com च्या मते, 2 सप्टेंबर रोजी फक्त कॅंडीमध्ये पाऊस पडणार आहे. तसेच जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून दिवसभर ढगाळ वातावरण राहील. अशा परिस्थितीत जर खेळपट्टी ओली झाली तर ती कोरडी होण्याची शक्यताही कमी असते. अशा परिस्थितीत पाऊस थांबल्यास सामना होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – VIDEO : रक्षाबंधनाच्या दिवशी भावाचा मृत्यू, बहिणीने रडत बांधली राखी, सर्वांचे डोळे पाणावले!

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. अशा स्थितीत पाकिस्तानचे 2 सामन्यांत 3 गुण होतील आणि संघ सुपर-4 साठी पात्र ठरेल. त्यानंतर 4 सप्टेंबर रोजी भारत आणि नेपाळ यांच्यात होणाऱ्या सामन्यातील विजयी संघ सुपर-4 मध्ये पोहोचणारा दुसरा संघ बनेल. नेपाळचा संघ प्रथमच आशिया चषकात प्रवेश करत आहे. भारत आणि नेपाळ यांच्यात पहिल्यांदाच सामना होणार आहे.

आशिया कपसाठी दोन्ही संघ

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, इशान किशन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इफ्तिखार अहमद, इमाम उल हक, मोहम्मद हारिस, मोहम्मद रिझवान, शौद शकील, आगा सलमान, फहीम अश्रफ, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम , हरिस रौफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि उस्मान मीर.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment