Asia Cup 2023 IND vs PAK : क्रिकेटच्या मैदानावर आज ब्लॉकबस्टर लढत पाहायला मिळत आहे. आशिया चषक 2023 स्पर्धेमध्ये आज भारतीय संघ सुपर फोरमधील पहिला सामना पाकिस्तानशी खेळत आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये होणाऱ्या या सामन्यात पाकिस्तानचा कप्तान बाबर आझमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात जसप्रीत बुमराह आणि केएल राहुल परतले आहेत. श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे बाहेर आहे.
सध्या सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान दुसऱ्यांदा आमनेसामने आले आहेत. याआधी, दोन शेजारी देश गट सामन्यातही भिडले होते, मात्र तो सामना पावसामुळे अर्ध्यातच थांबवावा लागला. तसे या सामन्यातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसामुळे आज निकाल लागला नाही, तर सामना राखीव दिवशी (11 सप्टेंबर) जाईल.
हेही वाचा – Petrol Diesel Price Today : महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त! जाणून घ्या आज जाहीर झालेले दर
पाकिस्तान संघ व्यवस्थापनाने भारताविरुद्धच्या सामन्यासाठी एक दिवस अगोदर प्लेइंग-11 जाहीर केली. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी प्लेइंग-11 मध्ये बदल झाला आहे. मोहम्मद नवाज भारताविरुद्धच्या ग्रुप स्टेज मॅचमध्ये खेळताना दिसला होता. आता दुसऱ्या सामन्यात नवाजच्या जागी फहीम अश्रफला स्थान मिळाले आहे.
दोन्ही संघांची Playing 11
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
पाकिस्तान – बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), शादाब खान (उपकर्णधार), फहीम अश्रफ, हारिस रौफ, नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!