

Asia Cup 2023 IND vs PAK : आशिया कप 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात ब्लॉकबस्टर सामना खेळला जात आहे. पल्लेकेले स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताने पाकिस्तानला 50 षटकात 267 धावांचे आव्हान दिले आहे. पाकिस्तानने भारताला 48.5 षटकात ऑलआऊट केले. भारताकडून इशान किशनने (82) आणि हार्दिक पांड्या (87) यांनी सर्वाधिक योगदान दिले.
भारताचा डाव
टीम इंडियाला कर्णधार रोहित शर्माच्या रुपात पहिला धक्का बसला. शाहीन आफ्रिदीने त्याला बोल्ड केले. 22 चेंडूंचा सामना करताना रोहितने 2 चौकारांसह 11 धावा केल्या. शाहीन आफ्रिदीनेही विराट कोहलीलाही (4) स्वस्तात बाद केले. त्यानंतर श्रेयस अय्यर (14) आणि शुबमन गिल (10) यांनीही झटपट विकेट गमावल्या. हारिस रौफने त्यांना बाद केले. 66 धावांत भारताने 4 विकेट्स गमावल्या. त्यानंतर इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी दीडशतकी भागीदारी रचली. किशनने 9 षटकार आणि 2 षटकारांसह 82 धावा केल्या, तर पांड्याने 7 चौकार आणि एका षटकारासह 87 धावा केल्या. या दोघांनंतर पाकिस्तानी गोलंदाजांनी भारताच्या शेपटाला लवकर गुंडाळले. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 4, नसीम शाह आणि हारिस रौफ यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले.
दोन्ही संघांची Playing 11
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
पाकिस्तान : फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हारिस रौफ.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!