IND vs PAK : “हटव तो कॅमेरा…”, रोहित शर्माला आला राग! काय घडलं? तुम्हीच पाहा VIDEO

WhatsApp Group

Asia Cup 2023 IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची सर्वांनाच प्रतीक्षा असते. संपूर्ण जगाचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे. आशिया कप-2023 मध्ये हे दोन्ही संघ शनिवारी आमनेसामने आले. या सामन्यावरही पावसाचे सावट होते. पल्लेकेले येथे खेळला जात असलेला हा सामना सुरू होण्यापूर्वी पाऊस पडला. यानंतर पहिल्या डावातील पाचवे षटक टाकले जात असतानाही पाऊस पडला आणि ब्रेकच्या वेळी रोहित शर्मा कॅमेरा टाळताना दिसला.

या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शुबमन गिलसोबत डावाची सुरुवात करण्यासाठी आला. टीम इंडियाच्या फलंदाजीची सुरुवात झाली. डावाचे पाचवे षटक सुरू होते आणि पाऊस पडल्याने फक्त दोन चेंडू टाकले गेले आणि सामना थांबवण्यात आला.

हेही वाचा – IND vs PAK : इशान किशनला OUT केल्यावर पाकिस्तानी गोलंदाजाचा ‘रागीट’ प्रकार! पाहा VIDEO

कॅमेऱ्याने त्रस्त रोहित

पावसामुळे सामना थांबला तेव्हा रोहित शर्मा डग आऊटमध्ये बसून आपल्या सहकाऱ्यांशी बोलत होता. पाऊस थांबला होता आणि रोहित-गिलने हेल्मेट घातले होते. दरम्यान कॅमेरामनची नजर रोहितवर पडली. तो कॅमेरा घेऊन त्याच्या जवळ उभा होता आणि त्याचे शूटिंग करत होता. पण रोहितला हे आवडले नाही. त्याने कॅमेरामनला कॅमेरा हटवण्यास सांगितले. रोहितचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

भारताची टॉप ऑर्डर कोलमडली

या सामन्यात भारतीय संघाचे फलंदाज पाकिस्तानच्या तुफानी वेगवान गोलंदाजीचा चांगलाच सामना करतील, अशी अपेक्षा होती. मात्र शाहीन शाह आफ्रिदीने भारतीय फलंदाजीला हादरवून सोडले. त्याने प्रथम रोहितला आपला बळी बनवले. पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रोहितला शाहीनने त्रिफळाचीत केले. यानंतर शाहीनने कोहलीलाही बोल्ड केले. हारिस रौफने श्रेयस अय्यरला आपला बळी बनवले. रोहितने 11 धावा केल्या. कोहलीला केवळ चार धावा करता आल्या. अय्यरने 14 धावा केल्या.

दोन्ही संघांची Playing 11

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.

पाकिस्तान : फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हारिस रौफ.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment