IND vs PAK Reserve Day : आजही मॅच झाली नाही तर? भारत बाहेर जाणार? जाणून घ्या!

WhatsApp Group

Asia Cup 2023 IND vs PAK Reserve Day : आज, आशिया चषक 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महत्त्वाचा सामना राखीव दिवशी खेळवला जाणार आहे. 10 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या आशियाई सुपर-4 च्या या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे खेळ थांबला तोपर्यंत टीम इंडियाने प्रथम खेळताना 24.1 षटकांत 2 बाद 147 धावा केल्या होत्या. आज इथून खेळ सुरू होईल. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे, जो कोणी हरेल, त्यांना अंतिम फेरी गाठणे फार कठीण जाईल. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने 56 आणि शुबमन गिलने 58 धावा केल्या. केएल राहुल 17 धावांवर तर विराट कोहली 8 धावांवर खेळत आहे. पाकिस्तानचा हा दुसरा सुपर-4 सामना तर भारतीय संघाचा पहिला सामना असल्याची माहिती आहे. सुपर-4 च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव केला होता.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. आज सोमवारी ससकाळी हलका रिमझिम पाऊस पडत असून ढगाळ वातावरण आहे. 90 टक्के पाऊस अपेक्षित आहे. अशा स्थितीत आजही सामना होणे कठीण आहे. जर हा सामना कमी षटकांचा झाला तर पाकिस्तानला 20 षटकांत 181 धावांचे लक्ष्य गाठता येईल. या सामन्यात कोणताही संघ हरला तरी फायनलमध्ये पोहोचणे त्यांच्यासाठी खूप कठीण असेल. विशेषत: टीम इंडियासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे.

हेही वाचा – VIDEO : पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीकडून जसप्रीत बुमराहला स्पेशल गिफ्ट!

…तर भारतीय संघ बाहेर जाईल!

सुपर-4 बद्दल बोलायचे झाले तर या फेरीत चारही संघांना 3-3 सामने खेळायचे आहेत. पाकिस्तान आणि श्रीलंका यांनी पहिले सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांचे सध्या 2-2 गुण आहेत. अशा परिस्थितीत भारतीय संघ आजचा सामना हरला तर अंतिम फेरीतील त्यांचा मार्ग कठीण होईल. जर पाकिस्तानने हा सामना जिंकला तर त्याचे 2 सामन्यात 4 गुण होतील तर भारताचे 1 सामन्यात 0 गुण होतील. सुपर-4 मध्ये आणखी तीन सामने कोलंबोतच होणार आहेत. या सामन्यातही पावसाचा धोका आहे. अशा स्थितीत उर्वरित तीन सामने रद्द झाल्यास पाकिस्तानचे 3 सामन्यांत 5 गुण, श्रीलंकेचे 3 सामन्यांत 4 गुण आणि भारताचे 3 सामन्यांत 2 गुण होतील. अशा स्थितीत भारतीय संघाला अंतिम फेरीत स्थान निश्चित करता येणार नाही. बांगलादेशचा 3 सामन्यांत फक्त एक गुण असेल.

सामना रद्द झाल्यानंतरही भारतीय संघाचे नुकसान

कोलंबोमधील हवामान पाहिल्यास आजचा सामना रद्द होऊ शकतो. टीम इंडियासाठीही हा धक्का कमी नाही. सामना रद्द झाल्यास भारत आणि पाकिस्तान या दोघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. यानंतर सुपर-4 चे पुढील तीन सामने पावसामुळे वाहून गेले तर पाकिस्तानचे 3 सामन्यात 4 गुण, श्रीलंकेचे 3 सामन्यात 4 गुण आणि भारताचे 3 सामन्यात 3 गुण होतील. तर बांगलादेशचा 3 सामन्यांत एक गुण असेल. या स्थितीतही टीम इंडिया जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडेल. श्रीलंकेचा संघ या स्पर्धेचा गतविजेता आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment