Asia Cup 2023 IND vs PAK : भारतीय संघ आशिया चषकाच्या सुपर-4 फेरीत पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरला आहे. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात प्रवेश करण्यापूर्वी टीम इंडियाला आपल्या प्लेइंग-11 बद्दल दुरुस्ती करावी लागली. मधल्या फळीतील अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल दुखापतीनंतर परतला असून तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे. दुसरीकडे नेपाळविरुद्ध न खेळलेल्या जसप्रीत बुमराहचीही या सामन्यासाठी निवड करण्यात आली.
मात्र, टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आहे की आशिया कपच्या महत्त्वाच्या टप्प्यावर श्रेयस अय्यरला दुखापत झाली आहे. पाठीच्या समस्येमुळे तो या सामन्यात खेळत नाहीये. अय्यरने 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध दीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. त्याने नऊ चेंडूत 14 धावा केल्या होत्या. त्याला नेपाळविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली नाही आणि या सामन्यापूर्वी तो दुखापतग्रस्त झाला. रोहित शर्माने नाणेफेकीच्या वेळी अय्यरची दुखापत दुर्दैवी असल्याचे म्हटले. श्रेयस बाहेर गेल्यानंतर नेटकऱ्यांनी टीका केली. श्रेयस सामन्याच्या काही वेळापूर्वीच दुखापतग्रस्त झाल्याचे सांगण्यात आले. मात्र केएल राहुलला जागा देण्यासाठी श्रेयसला बाहेर केले गेले, असे मत काहींनी दिले आहे. या सामन्यात पाकिस्तानचा कप्तान बाबर आझमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्चाचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा – IND vs PAK : पाकिस्तानने जिंकला टॉस, रोहित शर्माला पाहिजे तेच मिळालं!
सध्या सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान दुसऱ्यांदा आमनेसामने आले आहेत. याआधी, दोन शेजारी देश गट सामन्यातही भिडले होते, मात्र तो सामना पावसामुळे अर्ध्यातच थांबवावा लागला. तसे या सामन्यातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसामुळे आज निकाल लागला नाही, तर सामना राखीव दिवशी (11 सप्टेंबर) जाईल.
दोन्ही संघांची Playing 11
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
पाकिस्तान – बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), शादाब खान (उपकर्णधार), फहीम अश्रफ, हारिस रौफ, नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!