Asia Cup 2023 : आज भारत-पाकिस्तान सामन्यात 5 मोठे विक्रम होण्याची शक्यता!

WhatsApp Group

Asia Cup 2023 IND vs PAK : आज (10 सप्टेंबर) आशिया चषक 2023 च्या सुपर-4 मधील भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध आहे. हा सामना श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे भारतीय वेळेनुसार दुपारी 3.00 वाजता होणार आहे. या सामन्यासाठी मैदानात उतरताच भारतीय कर्णधार रोहित शर्मा एक विक्रम आपल्या नावावर करेल.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सहभाग घेतल्याने रोहित आशिया कपमध्ये सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळणारा संयुक्त दुसरा खेळाडू बनेल. यासह असे 5 मोठे विक्रम आहेत, जे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या सामन्यात होऊ शकतात. या सर्व रेकॉर्ड्सवर एक नजर टाकूया…

बाबर आझमला संधी

बाबर आझमने भारतीय संघाविरुद्ध शतक ठोकल्यास तो नवा विक्रम प्रस्थापित करेल. या शतकासह बाबर पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू सईद अन्वरची बरोबरी करेल ज्याने वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके झळकावली आहेत. अन्वरने 20 एकदिवसीय शतके झळकावली आहेत. तर बाबर हा आतापर्यंत 19 शतकांसह दुसरा पाकिस्तानी खेळाडू आहे.

हेही वाचा – Maharashtra : एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता

जडेजाकडे 200 विकेट्स पूर्ण करण्याची संधी

भारताचा स्टार फिरकी अष्टपैलू रवींद्र जडेजाने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत आतापर्यंत 179 सामने खेळले असून 172 डावांत 197 बळी घेतले आहेत. जर त्याने पाकिस्तानविरुद्ध 3 विकेट घेतल्या, तर तो 200 वनडे विकेट्स पूर्ण करणारा तिसरा भारतीय फिरकी गोलंदाज बनेल. तर एकूण 200 वनडे विकेट्स पूर्ण करणारा तो सातवा भारतीय ठरेल.

आशिया कपमध्ये इरफान पठाणचा विक्रम

पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणचा विक्रमही धोक्यात आला आहे. इरफान पठाण आणि रवींद्र जडेजा हे भारतीय गोलंदाज आहेत ज्यांनी एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेत संयुक्तपणे सर्वाधिक 22-22 विकेट घेतल्या आहेत. जडेजाने आणखी एक विकेट घेतल्यास तो पठाणचा विक्रम मोडेल. अशाप्रकारे जडेजा एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनेल.

रोहितने अर्धशतक ठोकले तर…

एकदिवसीय आशिया कपमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 50+ धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमारा संगकाराच्या नावावर आहे. त्याने 12 वेळा ही कामगिरी केली आहे. श्रीलंकेचा माजी खेळाडू सनथ जयसूर्या आणि सचिन तेंडुलकर यांनी 9-9 वेळा हा पराक्रम केला आहे. त्याच्यानंतर, भारतीय कर्णधार रोहित शर्माने एकदिवसीय आशिया कपमध्ये 8 वेळा 50+ धावा केल्या आहेत. त्याने पाकिस्तानविरुद्ध आणखी एक अर्धशतक ठोकल्यास तो सचिन आणि जयसूर्याच्या बरोबरीने असेल.

आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम

भारतीय कर्णधार रोहित शर्माने एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेत आतापर्यंत 24 सामने खेळले आहेत आणि तो या स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारा भारतीय देखील आहे. पण एकूण सर्वाधिक सामने खेळण्याच्या बाबतीत रोहित संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहे. रोहित व्यतिरिक्त श्रीलंकेचे माजी दिग्गज कुमार संगकारा, मुथय्या मुरलीधरन आणि अरविंदा डी सिल्वा यांनी अनेक सामने खेळले आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सहभागी झाल्याने रोहित संयुक्त दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल.

एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेच्या नावावर असून, त्याने 28 सामने खेळले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असताना श्रीलंकेचा माजी सनथ जयसूर्या आणि बांगलादेशचा मुशफिकुर रहीम यांनी संयुक्तपणे 25-25 सामने खेळले आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment