Asia Cup 2023 IND vs PAK : पाकिस्तानपाठोपाठ भारतानेही नेपाळचा 10 गडी राखून पराभव करत अभिमानाने सुपर-4 गाठली. रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामीच्या जोडीने कॅंडी येथील पावसाचा व्यत्यय असलेल्या सामन्यात 17 चेंडू शिल्लक असताना 145 धावांचे सुधारित लक्ष्य एकही विकेट न गमावता पूर्ण केले. भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतके ठोकली. आशिया चषक स्पर्धेतील शेवटचा ग्रुप स्टेज सामना मंगळवारी होणार असून बुधवारपासून सुपर-4 फेरीला सुरुवात होणार आहे. भारत आणि पाकिस्तानचे संघ सुपर-4 मध्ये पोहोचले आहेत. उरलेल्या दोन संघांचा निर्णय मंगळवारी अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने होणार आहे.
यापूर्वी आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2 सप्टेंबर रोजी होणारा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही आणि तो रद्द करावा लागला होता. दोन्ही देशांतील चाहत्यांच्या उत्कंठावर्धक क्रिकेट पाहण्याच्या इच्छा धुळीला मिळाल्या. आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 10 सप्टेंबर रोजी आशिया चषकाच्या सुपर-4 फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. उभय देशांमधला पहिला सामना कँडीत खेळला गेला होता, जो पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. फक्त भारतीय संघ फलंदाजी करू शकला आणि पाकिस्तानच्या डावात एकही चेंडू टाकता आला नाही.
हेही वाचा – Asia Cup 2023 : गौतम गंभीरचे भर मैदानात अश्लील वर्तन, Video व्हायरल!
आता दोन्ही संघ 10 सप्टेंबर रोजी सुपर-4 फेरीत भिडतील. या सामन्याचे ठिकाण कोलंबो आहे पण मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत हा सामना हंबनटोटा येथे हलवला जाऊ शकतो. केवळ हा सामनाच नाही तर सुपर-4 फेरीचे आणखी 4 सामने कोलंबोमध्ये होणार आहेत, ते हंबनटोटा येथे हलवता येतील. श्रीलंकेच्या दक्षिण भागात वसलेल्या या शहरात सप्टेंबर महिन्यात कमी पाऊस पडतो.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!