Asia Cup 2023 IND vs PAK : आशिया कप 2023 मध्ये कोलंबोत रंगलेल्या महामुकाबल्यात भारताने पाकिस्तानचा 228 धावांनी धुव्वा उडवला आहे. पावसानंतर 357 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला पाकिस्तानी संघ कुलदीप यादवच्या तावडीत अडकला. कुलदीप यादवने आठ षटकांत 25 धावा देत 5 बळी घेत पाकिस्तानच्या डावाला खिंडार पाडले. त्याने फखर जमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, इफ्तिखार अहमद आणि फहीम अश्रफ या सलामीवीरांना बाद केले. कुलदीप यादव हा सचिन तेंडुलकरनंतरचा पहिला भारतीय फिरकी गोलंदाज ठरला, ज्याने पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामन्यात 5 बळी घेतले. त्याचवेळी दुखापतीमुळे नसीम शाह आणि हारिस रौफ फलंदाजीला आले नाहीत आणि पाकिस्तान 32 षटकात 128 धावांवर ऑलआऊट झाला.
राखीव दिवशी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना एक तास 40 मिनिटे उशीराने सुरू झाला. तत्पूर्वी भारताचे सलामीवीर रोहित शर्मा (56) आणि शुबमन गिल (58) यांनीही चांगली फलंदाजी केली. रविवारी आशिया चषक सुपर फोरच्या सामन्यात भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आले, पण पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही. कालचे नाबाद परतलेले फलंदाज विराट कोहली आणि केएल राहुल यांनी भारतीय डावाची सुरुवात केली. दोघांनी जबरदस्त शतके ठोकली. /या दोघांच्या शतकांच्या जोरावर भारताने 50 षटकात 2 बाद 356 धावा केल्या.
हेही वाचा – Maintaining Stable Weight in Women : वजन नियंत्रित ठेवल्यास आयुष्य वाढतं? जाणून घ्या संशोधन काय सांगतं!
शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह या पाकिस्तानच्या वर्ल्ड क्लास गोलंदाजांची धुलाई करत राहुल आणि विराट यांनी राखीव दिवशी फलंदाजी केली. आज हारिस रौफ दुखापतीमुळे गोलंदाजी करू शकला नाही. डावाच्या शेवटच्या षटकात नसीम शाहलाही दुखापत झाल्याचे समोर आले. या सामन्यात राहुल, विराटने मिळून नाबाद 233 धावांची भागीदारी केली. राहुलने 12 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 111 तर विराटने 9 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 122 धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 13000 धावा करणारा विराट सर्वात वेगवान फलंदाज ठरला. त्याचे हे 47वे एकदिवसीय शतक ठरले. पाकिस्तानकडून आफ्रिदी आणि शादाब खानने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकता आले नाही. फखर जमानने पाकिस्तानकड़ून सर्वाधिक 27 धावांची खेळी केली. त्याव्यतिरिक्त सलमान अली आगा (23) आणि इफ्तिखार अहमद (23) यांनी थोडा प्रतिकार केला. भारताकडून जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूरला प्रत्येकी 1 विकेट मिळाली.
दोन्ही संघांची Playing 11
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
पाकिस्तान – बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), शादाब खान (उपकर्णधार), फहीम अश्रफ, हारिस रौफ, नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!