

Asia Cup 2023 IND vs PAK : आशिया कप 2023 मध्ये रंगलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात इशान किशनने सुंदर फलंदाजी केली. पल्लेकेलेच्या मैदानावर प्रथमच पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या इशानने एकापेक्षा एक सुंदर फटकेबाजी करत 82 धावांची दमदार खेळी केली. इशानचा डाव हारिस रौफने संपुष्टात आणला. इशानला पॅव्हेलियनमध्ये पाठवल्यानंतर पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजाने मधल्या मैदानावर उग्र वृत्ती दाखवली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
81 चेंडूत 82 धावा केल्यानंतर इशान किशन हारिस रौफच्या चेंडूवर मोठा फटका मारून पॅव्हेलियनमध्ये परतला. रौफच्या चेंडूवर भारतीय फलंदाजाला आपल्या शॉटवर नियंत्रण ठेवता आले नाही. कर्णधार बाबर आझमने कोणतीही चूक न करता सोपा झेल घेतला. इशानला बाद केल्यानंतर हारिस रौफने मैदानाच्या मध्यभागी आपली वृत्ती दाखवली आणि इशानकडे हाताने इशारा करत ‘चल जा इथून’ असे हावभाव करताना दिसला. या सामन्याच्या एक दिवस आधी हारिस रौफ भारताच्या खेळाडूंशी चर्चा करताना दिसला. तेव्हाचा आणि विकेट घेतल्यानंतरचा हारिस रौफ कसा आहे, हे आपल्या व्हिडिओमध्ये कळते.
हेही वाचा – IND vs PAK : रोहित, विराट फ्लॉप, ‘या’ दोघांनी वाचवली भारताची लाज! पाकिस्तानला ‘मोठं’ टार्गेट
आशिया कप 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात ब्लॉकबस्टर सामना खेळला जात आहे. पल्लेकेले स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताने पाकिस्तानला 50 षटकात 267 धावांचे आव्हान दिले आहे. पाकिस्तानने भारताला 48.5 षटकात ऑलआऊट केले. भारताकडून इशान किशनने (82) आणि हार्दिक पांड्या (87) यांनी सर्वाधिक योगदान दिले. इशानने आपल्या खेळीत 9 चौकार आणि दोन गगनचुंबी षटकार ठोकले.
दोन्ही संघांची Playing 11
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
पाकिस्तान : फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हारिस रौफ.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!