IND vs BAN : जगातील सर्वात महागडा ‘वॉटर बॉय’ कसा धावतोय बघा!

WhatsApp Group

Asia Cup 2023 IND vs BAN : आशिया चषक 2023 स्पर्धेच्या सुपर-4 सामन्यात भारतीय संघ आणि बांगलादेश आमनेसामने आहेत. बांगलादेश आधीच स्पर्धेतून बाहेर पडला आहे. हा सामना टीम इंडियासाठी सरावसारखा असेल. भारतीय संघ आधीच फायनलमध्ये पोहोचला आहे. 17 सप्टेंबर रोजी विजेतेपदाचा सामना होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाने विराट कोहलीला विश्रांती दिली. विराट या सामन्यात वॉटर बॉय बनला. त्याचा एक मजेशीर व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.

या सामन्यात बांगलादेशचा संघ टॉस हरला. त्यांना प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. विराट कोहली वॉटरबॉय असल्याने ड्रिंक्स ब्रेकमध्ये त्याने खेळाडूंना पाणी दिले. मैदानात धावत येताना मजेशीर कृत्य केले. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. विराटला नेटिझन्स जगातील महागडा वॉटर बॉयही म्हणत आहेत. या सामन्यात तिलक वर्माला वनडे पदार्पण करण्याची संधी मिळाली.

https://twitter.com/DisneyPlusHS/status/1702631956847235323

हेही वाचा – UPSC Interview Questions : जगातील सर्वात मोठे राष्ट्रगीत कोणत्या देशाचे आहे?

या सामन्यात विराट कोहली, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि हार्दिक पांड्याला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि प्रसिध कृष्णा यांचा समावेश आहे.

दोन्ही संघांची Playing 11

भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा.

बांगलादेश – लिटन दास (विकेटकीपर), तन्जीद हसन तमीम, एनामुल हक, शाकिब अल हसन (कर्णधार), तौहीद हृदोय, शमीम हुसेन, मेहदी हसन मिराज, महेदी हसन, नसुम अहमद, तन्जीद हसन शाकिब, मुस्तफिजुर रहमान.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment