IND vs BAN : बांगलादेशकडून भारताला जबर धक्का, ‘जायंट किलर’चा ऐतिहासिक विजय!

WhatsApp Group

Asia Cup 2023 IND vs BAN : आशिया कपच्या अंतिम सामन्यात पोहोचलेल्या भारतीय संघाला बांगलादेशने खडबडून जागे करत विजय मिळवला आहे. सुपर-4च्या सामन्यात बांगलादेशने भारताला 6 धावांनी मात दिली. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 266 धावांचे लक्ष्य दिले. कप्तान शाकिब अल हसनच्या दमदार फलंदाजीमुळे बांगलादेशने अडीचशेचा टप्पा ओलांडला. प्रत्युत्तरात भारताकडून शुबमन गिलने शतक ठोकले. शेवटच्या षटकात अक्षर पटेलने 42 धावांची खेळी केली. पण तो बाद झाल्याने भारताचा डाव 259 धावांतच संपुष्टात आला.

भारतीय संघाला पहिला झटका लवकर बसला. रोहित शर्माला पदार्पणवीर तन्जिम हसन शाकिबने बाद केले. रोहितला खातेही उघडता आले नाही. पदार्पणाचा सामना खेळणारा तिलक वर्मा काही विशेष करू शकला नाही. त्याला तन्जिम हसन साकिबने बोल्ड केले. तिलकने 5 धावा केल्या. केएल राहुल शमीम हुसेनच्या हाती महेदी हसनकरवी झेलबाद झाला. राहुलने 39 चेंडूत 19 धावा केल्या. सूर्यकुमार यादवला शकीब अल हसनने बोल्ड केले. सूर्यकुमारने 34 चेंडूत 26 धावा केल्या. एका बाजूने शुबमन गिलने किल्ला लढवला. त्याने 8 चौकार आणि 5 षटकारांसह 121 धावांची सुंदर खेळी केली. महेदी हसनने त्याला मोक्याच्या क्षणी बाद केले. त्यानंतर अक्षर पटेलने 3 चौकार आणि 2 षटकारांसह 42 धावांची खेळी केली. 49व्या षटकात तो बाद झाला आणि सामनाच पालटला. बांगलादेशकडून मुस्तफिजुर रहमानने सर्वाधिक 3 बळी घेतले.

हेही वाचा – IND vs BAN : जगातील सर्वात महागडा ‘वॉटर बॉय’ कसा धावतोय बघा!

बांगलादेशने भारताला विजयासाठी 266 धावांचे लक्ष्य दिले. बांगलादेशने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट गमावत 265 धावा केल्या. बांगलादेशकडून कर्णधार शाकिब अल हसनने 85 चेंडूंत 80 धावा केल्या, ज्यात 6 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. तौहीद हृदोयने 54 धावांची खेळी केली. हृदोयने 81 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकार ठोकले. नसूम अहमदने 44 आणि महेदी हसनने नाबाद 29 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमीने 2 आणि शार्दुल ठाकूरने 3 बळी घेतले. तन्जीद हसन आणि महेदी हसनने प्रत्येकी 2 बळी घेतले.

दोन्ही संघांची Playing 11

भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा.

बांगलादेश – लिटन दास (विकेटकीपर), तन्जीद हसन तमीम, एनामुल हक, शाकिब अल हसन (कर्णधार), तौहीद हृदोय, शमीम हुसेन, मेहदी हसन मिराज, महेदी हसन, नसुम अहमद, तन्जीद हसन शाकिब, मुस्तफिजुर रहमान.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment