Asia Cup 2023 : गौतम गंभीरचे भर मैदानात अश्लील वर्तन, Video व्हायरल!

WhatsApp Group

Gautam Gambhir : भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर त्याच्या संतप्त वृत्तीसाठी ओळखला जातो. त्याचा राग पुन्हा एकदा दिसून येत आहे. गंभीर सध्या आशिया कप 2023 (Asia Cup 2023) मध्ये कॉमेंट्री करत आहे. सोमवारी भारत आणि नेपाळ यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात गंभीर मैदानावरून परतत असताना त्याला पाहून लोकांनी कोहली-कोहलीच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. गंभीर फोनवर बोलत होता पण कोहली-कोहलीचा नारा ऐकून त्याला राग आला आणि त्याने मधले बोट दाखवले. कोहली आणि गंभीर यांच्यात 2013 पासून भांडण सुरू आहे. त्यावर्षी आयपीएलमध्ये दोघांमध्ये बाचाबाची झाली होती.

अलीकडेच, IPL 2023 मध्ये या दोघांमध्ये भांडण झाले होते जे खूपच वाढले होते. गंभीर हा आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर होता आणि विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळत होता. या सामन्यात लखनऊच्या फलंदाजीदरम्यान नवीन उल हक आणि कोहली यांच्यात बाचाबाची झाली. सामना संपल्यानंतरही दोघांमध्ये वाद झाले. त्यांच्या भांडणात गंभीरने पुन्हा हस्तक्षेप केला आणि दोघांमध्ये जोरदार वाद झाला.

https://twitter.com/imleser82/status/1698692736084570411

हेही वाचा – Asia Cup 2023 : “तुमची मैत्री मैदानाबाहेर ठेवा…”, भारतीय खेळाडूंवर भडकला गौतम गंभीर!

मात्र, कोहली आणि गंभीर यांच्यातील ही लढत ताजी नाही. ही लढत खूप जुनी आहे आणि आयपीएलपासून सुरू आहे. 2013 मध्ये जेव्हा कोहली बंगळुरूचा कर्णधार होता आणि गंभीर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार होता तेव्हा खेळल्या गेलेल्या सामन्यात दोन्ही संघांमध्ये लढत झाली होती. कोहली आऊट झाल्यानंतर गंभीर काही बोलला होता, ज्याला कोहलीने प्रत्युत्तर दिले आणि त्यानंतर गंभीर चिडला आणि विराटशी भांडायला आला. संघसहकाऱ्यांनी पुन्हा हस्तक्षेप केला. तेव्हापासून या दोघांमध्ये तणाव निर्माण झाला होता जो नुकताच IPL 2023 मध्ये आणखी वाढला होता.

यंदाच्या आयपीएलमधील वादानंतर या दोघांमधील भांडण खूपच पुढे गेले. सोशल मीडियावर दोघांचे चाहते एकमेकांना ट्रोल करत आहेत. गंभीर ही अशी व्यक्ती आहे, जी कोहलीबद्दल सतत बोलत असते. कोहली आशिया कप 2023 च्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अपयशी ठरला होता आणि त्याला केवळ चार धावा करता आल्या होत्या. यानंतर गंभीरने स्टार स्पोर्ट्सवर बोलताना कोहलीवर टीका केली आणि त्याच्या शॉट्स सिलेक्शनवर प्रश्न उपस्थित केले.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment