Gautam Gambhir : भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आशिया कप 2023 (Asia Cup 2023) मध्ये सोमवारी (4 सप्टेंबर) झालेल्या भारत-नेपाळ सामन्यातील आहे. व्हिडिओमध्ये गंभीरला पाहून काही प्रेक्षक कोहली आणि धोनीच्या नावाने घोषणा देत आहेत. यानंतर गंभीर चाहत्यांसमोर मधले बोट दाखवताना दिसला. या व्हिडिओनंतर अनेकांनी गंभीरला ट्रोल केले.
मात्र गंभीरने स्वत: पुढे येऊन याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. तो मीडियासमोर आला आणि म्हणाला की, त्यावेळी काही पाकिस्तानी प्रेक्षकही उपस्थित होते, ज्यांनी हिंदुस्थान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. काश्मीरचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. त्या पाकिस्तानी प्रेक्षकांच्या या कृतीचा गंभीरला राग आला. यानंतरच त्याने रागाच्या भरात त्या पाकिस्तानींना उत्तर देण्यासाठी ते मधले बोट दाखवले. भारत आणि नेपाळ यांच्यातील सामना श्रीलंकेच्या पल्लेकेले येथे झाला होता.
हेही वाचा – Asia Cup 2023 IND vs PAK : भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, तारीख ठरली!
गंभीरचे स्पष्टीकरण
गंभीर म्हणाला, ”पहिली गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर जे दाखवले जाते ते खरे नाही. तिथे लोक त्यांच्या बाजूने जे दाखवायचे ते दाखवतात. व्हायरल झालेल्या व्हिडीओमधलं सर्वात मोठं सत्य हे आहे की, तुम्ही भारतविरोधी घोषणा दिल्यास, किंवा काश्मीरबद्दल बोलाल, तर लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रतिक्रिया देतात किंवा हसून निघून जातात.”
गंभीर म्हणाला, ”त्यामुळेच तेथे 2-3 पाकिस्तानी लोक होते. जे हिंदुस्तान मुर्दाबाद बोलत होते आणि काश्मीरबद्दल बोलत होते. मी माझ्या देशाबद्दल किंवा देशाविरुद्ध काहीही ऐकू शकत नाही. तुम्ही मला वैयक्तिकरित्या शिवीगाळ केलीत तर मी हसत हसत निघून जाईन असे तुम्हाला वाटते का? मी तसा नाही. सामना बघायला आला असाल तर आपल्या देशाला साथ द्या. यात राजकीय काहीही करू नका.” आशिया कपमध्ये गंभीर समालोचन करत आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!