Asia Cup 2023 Final IND vs SL : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) श्रीलंकेचे कंबरडे मोडत वाईट अवस्था केली. आशिया कप 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सिराजने पहिल्या 15 षटकांच्या कालावधीत 6 विकेट्स घेतल्या. त्याने एकाच षटकात 4 लंकन फलंदाजांना तंबूत पाठवले. सिराजच्या स्वप्नवत गोलंदाजीमुळे श्रीलंकेने 50 धावा गाठण्यापूर्वीच 8 विकेट्स गमावल्या. सामन्यादरम्यान सिराजने अशी गोष्ट केली, की स्लीपमध्ये उभ्या असलेल्या विराट कोहलीसह सर्वांनाच हसू फुटले.
ही घटना सामन्याच्या चौथ्या षटकात घडली जेव्हा श्रीलंका 11/4 वर झुंजत असताना धनंजया डी सिल्वा पहिला चेंडूचा सामना करण्यासाठी खेळपट्टीवर आला. सर्व क्षेत्ररक्षक झेल घेण्याच्या स्थितीत असताना डी सिल्वाने चेंडू लाँग ऑफच्या दिशेने ढकलला. आधीच तीन विकेट्स घेतलेला आणि जोशात असलेला सिराज आपल्याच गोलंदाजीवर फटकावलेला आणि सीमारेषेकडे निघालेला चेंडू अडवायला धावला. सिराजने सीमारेषेपर्यंत धाव घेतली, पण त्याला चेंडू अडवण्यात यश आले नाही. हा प्रकार पाहून विराटही तोंड लपवून हसू लागला. या घटनेचा व्हि़डिओ व्हायरल होत आहे.
हेही वाचा – IND vs SL Final : 13 धावांवर 6 विकेट्स! मोहम्मद सिराजचा ‘बाप’ स्पेल; पाहा Video
श्रीलंकेचा डाव
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात कुसल परेराचा (0) अडथळा दूर केला. त्यानंतर मोहम्मद सिराजचे तुफान घोंगावले. त्याने एकाच षटकात पाथुम निसांका (2), सदीरा समरविक्रमा (0), चारिथ असलंका (0), धनंजया डी सिल्वा (4) यांना माघाडी धाडले. त्यानंतर सिराजने श्रीलंकेचा कप्तान दासुन शनाकाची (0) दांडी गुल केली. श्रीलंकेचा सलामीवीर कुसल मेंडिसलाही (17) सिराजने 12व्या षटकात बोल्ड केले. हार्दिक पांड्याने दुनिथ वेललागेला (8) बाद करत लंकेला आठवा हादरा दिला.
दोन्ही संघांची Playing 11
भारत – रोहित शर्मा (कप्तान), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
श्रीलंका – पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस(विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शनाका(कप्तान), दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन, मथीशा पाथिराना.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!