Asia Cup 2023 Final IND vs SL : कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर आशिया चषक 2023 चा अंतिम सामना रंगत आहे. या सामन्यात भारत-श्रीलंका आमनेसामने आहेत. लंकेचा कप्तान दासुन शनाकाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकापूर्वी संघाच्या तयारीसाठीसाठी हा सामना दोन्ही संघांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल दुखापतीमुळे या सामन्यात खेळत नाहीये. त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदर सामना खेळत आहे. शार्दुल ठाकूर संघाबाहेर आहे.
कोलंबोची खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करते. अशा स्थितीत टीम इंडियाने पुन्हा एकदा प्लेइंग-11 मध्ये 3 फिरकी गोलंदाजांना संधी दिली शकते. संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे, परंतु सध्या हवामान स्वच्छ आहे. या सामन्यासाठी राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे.
हेही वाचा – PM Vishwakarma Scheme : जाणून घ्या काय आहे पीएम विश्वकर्मा योजना, कोणाला मिळणार लाभ?
दोन्ही संघांची Playing 11
भारत – रोहित शर्मा (कप्तान), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
श्रीलंका – पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस(विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शनाका(कप्तान), दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन, मथीशा पाथिराना.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!