Asia Cup 2023 Final IND vs SL : आशिया कप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना अर्धा संपला आहे. श्रीलंकाचा आख्खा संघ फक्त 50 धावांत गारद झाला. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने 6 विकेट्स काढत कंबरडे मोडले. या सामन्यात श्रीलंकेचा कप्तान दासुन शनाकाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकापूर्वी संघाच्या तयारीसाठीसाठी हा सामना दोन्ही संघांच्या दृष्टीने महत्त्वाचा होता, पण लंकेने सपशेल गुडघे टेकले. भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल दुखापतीमुळे या सामन्यात खेळत नाहीये. त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदर सामना खेळत आहे. शार्दुल ठाकूर संघाबाहेर आहे.
श्रीलंकेचा डाव
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात कुसल परेराचा (0) अडथळा दूर केला. त्यानंतर मोहम्मद सिराजचे तुफान घोंगावले. त्याने एकाच षटकात पाथुम निसांका (2), सदीरा समरविक्रमा (0), चारिथ असलंका (0), धनंजया डी सिल्वा (4) यांना माघाडी धाडले. त्यानंतर सिराजने श्रीलंकेचा कप्तान दासुन शनाकाची (0) दांडी गुल केली. श्रीलंकेचा सलामीवीर कुसल मेंडिसलाही (17) सिराजने 12व्या षटकात बोल्ड केले. हार्दिक पांड्याने दुनिथ वेललागेला (8) बाद करत लंकेला आठवा हादरा दिला. प्रमोद मदुशन (1), मथीशा पाथिराना (0) यांनाही हार्दिकने बाद करत लंकेचा डाव 15.2 षटकात 50 धावांवर संपुष्टात आणला. भारताकडून मोहम्मद सिराजने 21 धावांत 6 विकेट्स घेतल्या. हार्दिक पांड्याने 3 धावांत 3 विकेट्स आपल्या नावावर केला.
हेही वाचा – IND vs SL Final : जोशात असलेल्या सिराजचा ‘तो’ प्रकार पाहून विराट हसू लागला! पाहा VIDEO
श्रीलंकासाठी सर्वात कमी ODI धावसंख्या
- 43 वि. दक्षिण आफ्रिका, पार्ल 2012
- 50 वि. भारत, कोलंबो 2023
- 55 वि. वेस्ट इंडिज, शारजाह 1986
- 67 वि. इंग्लंड, मँचेस्टर 2014
- 73 वि. भारत, त्रिवेंद्रम 2023
वनडे फायनलमध्ये सर्वात कमी धावसंख्या
- 50 श्रीलंका वि. भारत, कोलंबो 2023
- 54 भारत वि. श्रीलंका, शारजाह 2000
- 78 श्रीलंका वि. पाकिस्तान, शारजाह 2002
- 81 ओमान वि. नामिबिया, विंडहोक 2019
भारतासाठी सर्वोत्तम वनडे आकडेवारी
- 6/4 स्टुअर्ट बिन्नी वि. बांगलादेश, मीरपूर 2014
- 6/12 अनिल कुंबळे वि. वेस्ट इंडिज, कोलकाता 1993
- 6/19 जसप्रीत बुमराह वि. इंग्लंड, द ओव्हल 2022
- 6/21 मोहम्मद सिराज वि. श्रीलंका, कोलंबो 2023
हेही वाचा – पंतप्रधान मोदींचा पगार किती? त्यांची प्रॉपर्टी कुठेय? जाणून घ्या!
दोन्ही संघांची Playing 11
भारत – रोहित शर्मा (कप्तान), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
श्रीलंका – पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस(विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शनाका(कप्तान), दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन, मथीशा पाथिराना.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!