Asia Cup 2023 Final IND vs SL Mohammed Siraj : आशिया कप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात भारताने टॉस गमावला आणि त्यांना गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने लंकेच्या फलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडले. त्याने आपल्या पहिल्या 3 षटकात 5 धावात 5 विकेट्स काढल्या. त्याच्या भंबेरी उडवणाऱ्या स्पेलने श्रीलंकेची अवस्था 6 बाद 13 धावा झाली.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात कुसल परेराचा (0) अडथळा दूर केला. त्यानंतर मोहम्मद सिराजचे तुफान घोंगावले. त्याने एकाच षटकात पाथुम निसांका (2), सदीरा समरविक्रमा (0), चारिथ असलंका (0), धनंजया डी सिल्वा (4) यांना माघाडी धाडले. त्यानंतर सिराजने श्रीलंकेचा कप्तान दासुन शनाकाची (0) दांडी गुल केली. मोहम्मद सिराजने 50 वी एकदिवसीय विकेट मिळविण्यासाठी 1002 चेंडू टाकले. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील इतकी जलद कामगिरी करणारा तो दुसरा गोलंदाज आहे. यापूर्वी अजंथा मेंडिसने ही कामगिरी करण्यासाठी 847 टाकले होते.
हेही वाचा – सकाळी उठल्यावर कॉफी प्यायला आवडते? चूक करताय! वाचा ही महत्त्वाची माहिती
वनडेमध्ये 6 विकेट पडल्यानंतर सर्वात कमी धावसंख्या
- 10/6 कॅनडा वि. नेट किंग सिटी 2013
- 12/6 कॅनडा वि. श्रीलंका पार्ल 2003
- 12/6 श्रीलंका वि. भारत कोलंबो, कोलंबो 2023
- 13/6 श्रीलंका वि. दक्षिण आफ्रिता, पार्ल 2012
दोन्ही संघांची Playing 11
भारत – रोहित शर्मा (कप्तान), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
श्रीलंका – पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस(विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शनाका(कप्तान), दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन, मथीशा पाथिराना.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!