Asia Cup 2022 : मॅचआधीच विराटनं दाखवला मोठेपणा! बाबर आझमबाबत म्हणाला, “तो जगातला…”

WhatsApp Group

Virat Kohli On Babar Azam : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांच्यात सातत्यानं तुलना होत असते, मात्र आता खुद्द विराट कोहलीनंच बाबर आझमबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. विराट कोहलीच्या म्हणण्यानुसार, तो २०१९ च्या वनडे वर्ल्डकप दरम्यान बाबर आझमला पहिल्यांदा भेटला होता. यादरम्यान विराट बाबर आझमला म्हणाला होता की, तू सध्याचा सर्वोत्तम फलंदाज आहेस. त्याचे आणि माझे नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत.

विराट कोहली म्हणाला, ”वनडे वर्ल्डकप २०१९ दरम्यान मी बाबर आझमला मँचेस्टरमध्ये भेटलो. आम्ही जमिनीवर बसून खूप गप्पा केल्या होत्या. तो खूप आदरानं बोलत होता. मी इमाद वसीम आणि बाबर आझम यांना अंडर-१९ च्या दिवसांपासून ओळखतो. बाबर सध्या जगातील अव्वल फलंदाज असावा. मात्र असं असूनही त्याची समोरच्या व्यक्तीबद्दल आदर करण्याची वृत्ती बदललेली नाही. तो नेहमीच नम्रपणे वागतो. तो एक प्रतिभावान खेळाडू आहे. तो नेहमीच उत्कृष्ट क्रिकेट खेळत आला आहे. बाबरचा क्रिकेटकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही. बाबर आपली चमकदार कामगिरी कायम ठेवेल आणि युवा खेळाडूंना प्रेरणा देत राहील, अशी आशा मला आहे.”

हेही वाचा – पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीला भेटले विराट, चहल आणि पंत! VIDEO जिंकतोय लाखोंची मनं…

बाबर आझम उत्कृष्ट क्रिकेट खेळतोय – कोहली

नुकताच विराट आणि बाबरचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये विराट बाबरशी बोलताना दिसत आहे. या फोटोनंतर विराट म्हणाला, ”बाबर आझम हा महान खेळाडू आहे आणि तो उत्कृष्ट क्रिकेट खेळत आहे. त्याला भविष्यासाठी माझ्या शुभेच्छा.” आशिया कप २०२२ मध्ये भारत आणि पाकिस्तानचा संघ आज २८ ऑगस्ट रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात पासून खेळवला जाईल.

हेही वाचा – Asia Cup 2022 : भारत-पाकिस्तान थरारासाठी आख्खा देश सज्ज..! जाणून घ्या मॅचबाबत सर्व काही; फक्त एका क्लिकवर!

दोन्ही संघ –

भारत – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार अर्शदीप सिंग आणि आवेश खान.

पाकिस्तान – बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहबाज. धनी आणि उस्मान कादिर.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment