

Virat Kohli with Babar Azam : आशिया कप २०२२ स्पर्धा (Asia Cup 2022) हंगाम शनिवारी २७ ऑगस्टपासून सुरू होत आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २८ ऑगस्टला भारत आणि पाकिस्तान यांच्यात रोमांचक स्पर्धा होणार आहे. चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण या सामन्याआधीच भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम यांनी भेट घेतली. स्टार खेळाडूंच्या प्रशिक्षण सत्रादरम्यान दोघंही भेटले आणि एकमेकांचं स्वागत केलं. विराटनं बाबरच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याची विचारपूस केली.
यावेळी श्रीलंकेच्या यजमानपदावर आशिया कप युएईमध्ये खेळला जात आहे. याबाबत सर्व संघ यूएईला पोहोचले असून त्यांनी सरावही सुरू केला आहे. टीम इंडिया, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानसह इतर संघही सरावात व्यस्त आहेत. युझवेंद्र चहल, हार्दिक पंड्या आणि विराट कोहली यांच्यासह उर्वरित खेळाडूंना प्रथम अफगाणिस्तानच्या खेळाडूंना भेटताना दिसत आहे.
Champions both 👏👏@imVkohli @babarazam258 #AsiaCup2022 #Virat #Babar pic.twitter.com/KcLAzHq5lB
— Vikrant Gupta (@vikrantgupta73) August 24, 2022
हेही वाचा – Asia Cup 2022 : भारत-पाकिस्तान थरारासाठी आख्खा देश सज्ज..! जाणून घ्या मॅचबाबत सर्व काही; फक्त एका क्लिकवर!
बीसीसीआयनं शेअर केला व्हिडिओ
यूएईला पोहोचल्यानंतर विराट कोहली आणि राशिद खान यांचीही भेट होते. ते दोघे चौकशी करतात आणि पुढे जातात. यानंतर कोहली बाबर आझमला भेटतो. इथंही हे दोन्ही खेळाडू बोलतात आणि नंतर प्रशिक्षणासाठी जातात. विराट-बाबर या दोघांच्या भेटीचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याचा व्हिडिओ बीसीसीआयनंच शेअर केला आहे.
Hello DUBAI 🇦🇪
Hugs, smiles and warm-ups as we begin prep for #AsiaCup2022 #AsiaCup | #TeamIndia 🇮🇳 pic.twitter.com/bVo2TWa1sz
— BCCI (@BCCI) August 24, 2022
भारत-पाकिस्तान सामना
टीम इंडियाला या स्पर्धेतील पहिला सामना २८ ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. या शानदार सामन्यासाठी रोहित शर्मा आणि संघ पूर्णपणे तयार आहे. मात्र, स्पर्धेपूर्वी राहुल द्रविडला कोरोना झाला आहे, जो संघासाठी मोठा धक्का आहे. द्रविडच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मणला काळजीवाहू प्रशिक्षक म्हणून पाठवण्यात आलं आहे. बीसीसीआयच्या सूत्रांचे म्हणणे आहे की बोर्ड द्रविडच्या रिपोर्टवर लक्ष ठेवून आहे आणि जर त्याचा पुढील अहवाल निगेटिव्ह आला तर तो स्पर्धेच्या मध्यातही संघात सामील होऊ शकतो.
हेही वाचा – ‘हा’ मराठी माणूस देतोय विनोद कांबळीला नोकरी..! १ लाख असणार पगार; वाचा!
आशिया कपसाठी भारत-पाकिस्तान संघ
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक हुडा, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, , युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, आवेश खान.
स्टँडबाय : श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, दीपक चहर
पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, शाहनवाज डहानी, उस्मान कादिर आणि मोहम्मद हसनैन.