Team India Video : आशिया कप २०२२ (Asia Cup 2022) स्पर्धेमध्ये भारतीय क्रिकेट संघाने आपले दोन्ही गट सामने जिंकले आहे. आता सुपर-४ च्या तयारीसाठी टीम इंडियाला तीन दिवसांचा अवधी मिळाला आहे. भारताचा पुढील सामना ४ सप्टेंबरला आहे. अशा स्थितीत संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडनं आपल्या खेळाडूंना मजा-मस्ती करण्यासाठी वेळ दिला. त्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहलीसह संघाच्या स्टार खेळाडूंनी वेगवेगळ्या गोष्टीत मन रमवले. सर्व खेळाडूंनी आपापल्या पद्धतीनं पाण्यात मजा केली. काही बोटीत मस्ती करताना दिसले. त्यानंतर सर्व खेळाडूंनी बीच व्हॉलीबॉलचाही आनंद लुटला.
बीसीसीआयनं शेअर केला व्हिडिओ
बीसीसीआयनं खेळाडूंच्या मस्तीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये चहलनं सांगितलं की, सुट्टीच्या दिवशी प्रशिक्षक राहुल द्रविडनं ठरवलं की सर्व खेळाडू मजा करतील. इथं प्रत्येकासाठी काहीतरी नवीन आहे आणि अशा गोष्टींमुळे सर्व खेळाडूंमध्ये चांगली समज निर्माण होते. प्रत्येकजण संघ म्हणून एकत्र राहतो. ३१ ऑगस्ट रोजी हाँगकाँगविरुद्ध खेळल्यानंतर भारतीय संघाला ४ सप्टेंबरपर्यंत थोडा वेळ मिळाला, त्यामुळं टीम इंडियाचे खेळाडू मजा करत आहेत.
हेही वाचा – CPL 2022 : पोलार्डतात्या काय ऐकत नाय..! अद्भूत कॅच घेत सर्वांना केलंय थक्क; पाहा VIDEO
व्हिडिओमध्ये सलामीवीर केएल राहुल आणि अर्शदीप सिंग सर्फिंग करत आहेत, तर कर्णधार रोहित शर्मा बोटिंगचा आनंद घेत आहेत. त्याचवेळी चहल-अश्विन पॅडल बोट चालवत आहेत. विराट कोहलीसह संघातील इतर खेळाडूही बीचवर व्हॉलीबॉल खेळत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला अर्शदीप सिंगची एन्ट्री, त्यानंतर विराट कोहली लाइफ जॅकेट घातलेला दिसत आहे. १ मिनिट ३४ सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तासाभरात ४९ हजार लोकांनी तो पाहिला आहे.
When #TeamIndia hit 𝗨.𝗡.𝗪.𝗜.𝗡.𝗗! 👏
Time for some surf, sand & beach volley! 😎#AsiaCup2022 pic.twitter.com/cm3znX7Ll4
— BCCI (@BCCI) September 2, 2022
आशिया कप २०२२ मध्ये टीम इंडियाची कामगिरी आतापर्यंत चांगलीच राहिली आहे. पाकिस्तान आणि नंतर हाँगकाँगला पराभूत केल्यानंतर त्यांनी सुपर-४ मध्येही स्थान मिळवले आहे. या स्पर्धेच्या अ गटात भारताव्यतिरिक्त कोणता संघ सुपर-४ मध्ये स्थान मिळवेल, हे आजच्या पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग सामन्यानंतर कळेल. सुपर-४ मध्ये पोहोचल्यानंतर टीम इंडिया आता थोडी रिलॅक्स मोडवर गेली.
हेही वाचा – रोहित आणि रश्मिका…राडाच! हिटमॅनचं चित्रपटसृष्टीत पदार्पण? पोस्टर आलं समोर!
भारताचा सामना पुन्हा पाकिस्तानशी?
भारताशिवाय अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांनीही सुपर-४ मध्ये स्थान मिळवलं आहे. त्याचबरोबर या स्पर्धेसोबत बांगलादेशचा प्रवासही संपला आहे. सुपर-४ चा थरार शनिवारी शारजाहच्या मैदानावर म्हणजेच ३ सप्टेंबर रोजी श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यानं सुरू होईल. रविवारी म्हणजेच ४ सप्टेंबरला भारत कोणत्या संघासोबत खेळणार आहे, हे आजच्या (पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग) सामन्यातून कळेल.