Asia Cup 2022 : पाकिस्तानच्या विजयानंतर चाहत्यांनी खाल्ला मार..! अफगाण लोकांनी चोपलं; VIDEO व्हायरल!

WhatsApp Group

Asia Cup 2022 PAK vs AFG : आशिया चषक २०२२ स्पर्धा आता आणखी रोमांचक टप्प्यावर पोहोचली आहे. टीम इंडिया आणि अफगाणिस्तान दोन्ही संघ बाहेर पडले आहेत. तर पाकिस्तान आणि श्रीलंका संघाचा अंतिम सामना निश्चित झाला आहे. दरम्यान, पराभूत संघांच्या चाहत्यांमध्ये निराशा आणि संताप स्पष्टपणे दिसून आला. बुधवारी (७ सप्टेंबर) अफगाणिस्तान आणि पाकिस्तान संघात सामना झाला. जो खूपच रोमांचक होता. शेवटच्या षटकातही सामना कोणत्या मार्गानं जाईल हे कोणालाच कळत नव्हतं. पण पाकिस्तान संघानं शेवटच्या षटकात सलग दोन षटकार मारत सामना जिंकला.

सामना जिंकल्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांनी स्टेडियममध्ये गोंधळ घातला. त्यांनी अफगाण चाहत्यांवर संताप व्यक्त केला. पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना त्यांनी खुर्च्यांनी मारहाण केली. शाहजाहच्या स्टेडियममध्येच अफगाण चाहत्यांनी खुर्च्या फोडायला आणि फेकायला सुरुवात केली. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. उपद्रव करणार्‍या चाहत्यांच्या हातात अफगाणिस्तानचा झेंडा असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यांच्या कपड्यांवर आणि अंगावरही देशाचा ध्वज दिसत आहे.

हेही वाचा की – Asia Cup 2022 : पाकिस्तानच्या बॅट्समनचा रडीचा डाव..! आऊट झाल्यानंतर बॉलरवर उचलली बॅट; पाहा VIDEO

असा रंगला पाकिस्तान-अफगाणिस्तान सामना..

या सामन्यात अफगाणिस्तान संघानं नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ६ गडी बाद १२९ धावा केल्या. संघाकडून इब्राहिम झाद्राननं सर्वाधिक ३५ धावा केल्या. यानंतर १२७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची अवस्था बिकट झाली होती. त्यांनी ११८ धावांत ९ विकेट गमावल्या होत्या. मात्र शेवटच्या षटकात नसीम शाहनं सलग दोन षटकार मारत सामना जिंकला.

पाकिस्तान २०१४ नंतर प्रथमच आशिया कपच्या अंतिम फेरीत खेळणार आहे. शेवटच्या वेळी त्यांनी २०१४ मध्ये फायनलमध्ये धडक दिली होती. त्या सामन्यात पाकिस्ताननं बांगलादेशला हरवून ट्रॉफी जिंकली. पाकिस्तान तिसऱ्यांदा अंतिम फेरीत श्रीलंकेशी भिडणार आहे. १९८६ मध्ये ते लंकेच्या संघाकडून पराभूत झाले आणि २००० मध्ये त्यांनी श्रीलंकेचा पराभव केला.

हेही वाचा की – IPhone 14 आणि त्याच्या तीन भावांची घोषणा..! तिघांची किंमत महागडीचं; तरीही वाचा!

अफगाणिस्तान अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्यासोबतच भारताच्या आशाही संपुष्टात आल्या आहेत. आता तो गुरुवारी अफगाणिस्तानसाठी एकच सामना खेळणार आहे. आता दोघांचा हा फक्त औपचारिक सामना असेल. गुणतालिकेत श्रीलंका चार गुणांसह पहिल्या तर पाकिस्तान समान गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांमध्ये अंतिम सामना रंगणार आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment