IND vs PAK Asia Cup 2022 : ‘‘मी स्वतःला सुपरस्टार समजत होतो, पण…”, विजय देवरकोंडाला कळलं सत्य!

WhatsApp Group

Vijay Devarakonda At IND vs PAK Match : आशिया कप २०२२ (Asia Cup 2022) स्पर्धेतील हाय व्होल्टेज भारत-पाकिस्तान सामना (IND vs PAK) पाहण्यासाठी बॉलिवूडचा ‘लायगर’ म्हणजेच विजय देवरकोंडा रविवारी दुबईत पोहोचला. नाणेफेकीपूर्वी, समालोचक मयंती लँगरनं त्याला विराट कोहलीबद्दल विचारले, जो १००वा आंतरराष्ट्रीय टी-२० खेळत आहे. यावर विजय म्हणाला, जेव्हा मी मैदानावर आलो तेव्हा लोक ज्या प्रकारे विराट कोहलीसाठी जल्लोष करत होते, मला समजलं नाही की माझं अस्तित्व काय आहे? म्हणजे मी स्वतःला सुपरस्टार समजत होतो, पण खरा सुपरस्टार विराट आहे. त्याला त्याचा १००वा टी-२० सामना खेळताना पाहण्यासाठी उत्सुक आहे.”

विजय देवरकोंडानं पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम आणि भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण यांच्याशीही संवाद साधला. यावेळी विजयनं त्याच्या क्रिकेटवरील प्रेमाविषयी सांगितलं. वसीम अक्रमशी बोलताना विजय म्हणाला, “मला वाटायचं की एखाद्या दिवशी तू माझ्यासाठी गोलंदाजी करशील आणि मी तुझा चेंडू वेगानं मारेन. वसीम आणि वकार युनूसच्या गोलंदाजीचा मला धाक होता. त्यांची २० षटके विरोधी संघाला भारी असायची.” यावर वसीम अक्रम म्हणाला, ”आज तुम्ही माझ्यासमोर फलंदाजी करू शकता, पण २० वर्षांपूर्वीची गोष्ट वेगळी असती.”

हेही वाचा – IND Vs PAK Asia Cup 2022 : विराट कोहलीनं ठोकलं शतक; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव!

आपल्या कॉलेजच्या दिवसांची आठवण करून देताना विजय म्हणाला, “टीव्ही नसताना मी कोणाचा तरी रेडिओ हॉस्टेलच्या छतावर घेऊन जायचो आणि सिग्नल मिक्स करायचा जेणेकरून मला भारत-पाकिस्तान सामन्याची कॉमेंट्री ऐकता येईल.” नुकताच विजय देवरकोंडा यांचा ‘लिगर’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. धर्मा प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. या चित्रपटाने १६ कोटींची ओपनिंग केली होती आणि आतापर्यंत या चित्रपटाची एकूण कमाई ३०.३५ कोटी रुपये झाली आहे.

विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांच्या ‘लायगर’ला चाहत्यांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. काहींना हा चित्रपट आवडला, पण अनेकांनी या चित्रपटाबद्दल अत्यंत नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. याचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवर होताना दिसत आहे. विजयनं या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. अनन्या पांडे या चित्रपटाची मुख्य नायिका आहे. या चित्रपटात विजयसोबत रम्या कृष्णन, रोनित रॉय आणि मकरंद देशपांडे यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बॉक्सर माईक टायसननंही लिगरमध्ये कॅमिओ केला होता. हा चित्रपट पुरी जगन्नाथ यांनी दिग्दर्शित केला असून तो तेलुगू, तमिळ, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment