

Asia Cup 2022 : आशिया कप टी-२० स्पर्धेची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. या स्पर्धेचे मुख्य सामने २७ ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये सुरू होत आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना (IND vs PAK) २८ ऑगस्ट रोजी दुबईमध्ये होणार आहे. दोन्ही देशांचे क्रीडाप्रेमी या सामन्याची वाट पाहत आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २०२१ च्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तान क्रिकेट संघाकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दोन्ही देशांमधील टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांबाबत बोलायचं झालं, तर टीम इंडियाचा रेकॉर्ड चांगला आहे. कर्णधार रोहित तो कायम ठेवू इच्छितो. दोघांमध्ये आतापर्यंत नऊ टी-२० सामने खेळले गेले आहेत. भारतानं सात सामने जिंकले आहेत. दुसरीकडं पाकिस्तान संघ दोन सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे.
आशिया कपमध्ये दोन्ही संघांचा रेकॉर्ड!
आशिया कपमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्डही चांगला आहे. भारतानं आतापर्यंत सात वेळा विजेतेपद पटकावलं आहे. दुसरीकडं, पाकिस्तानचा संघ दोन वेळा चॅम्पियन बनू शकला आहे. आशिया चषक दुसऱ्यांदा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवला जात आहे. २०१६ मध्ये जेव्हा टीम इंडिया चॅम्पियन बनली तेव्हा पहिल्यांदाच याचं आयोजन करण्यात आलं होतं. जाणून घ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महान सामन्याशी संबंधित प्रत्येक माहिती…
Asia Cup 2022 Trophy. pic.twitter.com/0PL9ItdBU1
— Johns. (@CricCrazyJohns) August 23, 2022
हेही वाचा – OMG..! पाकिस्तानविरुद्धच्या मॅचपूर्वी भारताला ४४० व्होल्टचा धक्का; द्रविडची साथ तुटणार?
मॅचबाबत सर्वकाही…
आशिया चषक २०२२ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. हा सामना २८ ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात पासून खेळवला जाईल. या सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वाहिन्यांवर पाहता येईल. आणि तुम्ही Disney + Hotstar अॅपवर या सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.
Captain Rohit Sharma and his Indian team have left for the UAE for the Asia Cup 2022. (Insidesport) pic.twitter.com/J2GB93smnr
— Rohit Sharma Fanclub India (@Imro_fanclub) August 23, 2022
हेही वाचा – ‘हा’ मराठी माणूस देतोय विनोद कांबळीला नोकरी..! १ लाख असणार पगार; वाचा!
संभाव्य playing 11
- भारत – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.
- पाकिस्तान – बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), फखर जमान, आसिफ अली, इफ्तिखार अहमद, हैदर अली, शादाब खान (उपकर्णधार), मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह आणि शाहनवाज धनी.
दोन्ही संघ –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार अर्शदीप सिंग आणि आवेश खान.
हेही वाचा – भयानक..! नासानं शेअर केला ब्लॅक होलमधून येणारा आवाज; तुम्ही ऐकला का?
पाकिस्तान – बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहबाज. धनी आणि उस्मान कादिर.