Asia Cup 2022 : इंडिया क्वालिफाय फॉर मुंबई एअरपोर्ट..! श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर मीम्सचा महापूर! पाहा…

WhatsApp Group

Asia Cup 2022 : आशिया चषक २०२२ स्पर्धेमध्ये, भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्धच्या (IND vs SL) रोमहर्षक सामन्यात ६ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळं भारताचं अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न जवळपास भंगलं आहे, कारण आता भारतीय संघाला अंतिम फेरी गाठण्यासाठी इतर संघांवर अवलंबून राहावं लागणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं आठ गडी गमावून १७३ धावा केल्या, याला प्रत्युत्तर म्हणून श्रीलंकेच्या संघाने एक चेंडू आणि सहा विकेट्स राखून सामना जिंकला.

कर्णधार रोहित शर्माच्या ४१ चेंडूत ७५ धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघानं श्रीलंकेसमोर मोठी धावसंख्या उभारली होती, मात्र भारतीय गोलंदाज पुन्हा एकदा बचावात अपयशी ठरले. भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेची पहिली विकेट १२ व्या षटकात ९७ धावांवर मिळवली. यानंतर चहल आणि अश्विननं कमी अंतरात सलग चार विकेट घेत सामना बरोबरीत आणला. श्रीलंकेला विजयासाठी शेवटच्या १२ चेंडूत २१ धावांची गरज होती, पण अनुभवी गोलंदाज भुवनेश्वरनं १९व्या षटकात १४ धावा लुटल्या. मात्र, असं असतानाही युवा अर्शदीपने अखेरच्या षटकात चमकदार कामगिरी करत षटकाच्या पाचव्या चेंडूपर्यंत सामना खेचून आणला.

हेही वाचा – Asia Cup 2022 : टीम इंडिया बाहेर पडलीय का? फायनलमध्ये पोहोचेल का? इथं वाचा तुमच्या प्रश्नांची उत्तरं!

श्रीलंकेविरुद्ध अशा पराभवाची भारतीय चाहत्यांना अपेक्षा नव्हती. गोलंदाजांपासून फलंदाजांपर्यंत अनेक खेळाडूंनी निराशा केली आहे, ज्यांना सोशल मीडियावर चाहत्यांच्या टीकेला सामोरं जावं लागत आहे.

पराभवानंतर रोहित काय म्हणाला?

रोहित शर्माने संघाच्या पराभवासाठी फलंदाजांना जबाबदार धरलं. तो म्हणाला, ”साधी गोष्ट आहे. निकाल आम्हाला हवा होता. तो आला नाही. आम्ही मोठी धावसंख्या उभारू शकलो असतो. मला असं वाटतं की अशीच सुरुवात झाली. आम्ही १०-१५ धावा कमी केल्या. सामन्यादरम्यान फलंदाजांना काय करावं लागेल आणि ते कोणत्या प्रकारचे शॉट्स खेळू शकतात हे शिकावं लागेल. गेल्या काही महिन्यांपासून हा संघ सातत्यानं चांगली कामगिरी करत होता. अशा पराभवातून संघ म्हणून खूप काही शिकायला मिळेल.”

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment