IND vs PAK Asia Cup 2022 : “थोडसं सिक्रेट राहू द्या यार”, पाकिस्तानी पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावर रोहितचा षटकार; पाहा VIDEO!

WhatsApp Group

Rohit sharma Reply To Pakistani Journalist : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पाकिस्तानचा (IND vs PAK) सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. आशिया कप २०२२ (Asia Cup 2022) स्पर्धेमध्ये भारत-पाकिस्तान महामुकाबला दुबईच्या मैदानावर आज रविवारी (२८ ऑगस्ट) सायंकाळी होणार आहे. भारतासाठी रोहित शर्माला सलामी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, त्याचा जोडीदार कोण असेल, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. भारतानं सलामीवीर म्हणून सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत यांचा प्रयत्न केला आहे तर केएल राहुल या स्पर्धेत पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. ओपनिंगच्या मुद्द्यावर पाकिस्तानच्या एका पत्रकारानं पत्रकार परिषदेत रोहितला प्रश्न विचारला. रोहितचं उत्तर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाकिस्तानी पत्रकारानं प्रश्न विचारला, “गेल्या काही मालिकांमध्ये भारतानं नवीन कॉम्बिनेशन्स आजमावले आहेत. कधी पंत येतोय, कधी सूर्यकुमार यादव येतोय. ते फक्त केएल राहुल नसल्यामुळं. आता तो परत आला आहे. तुझा नवीन सलामीचा जोडीदार कोण बघायला मिळेल?” यावर रोहित म्हणाला, ”टॉस झाल्यावर कोण येईल ते बघा. थोडसं सीक्रेट राहू दे यार..…”

हेही वाचा – Asia Cup 2022: मॅचपूर्वी रोहित शर्माचा ‘तो’ सल्ला ऐकून बाबर आझम लाजला..! VIDEO व्हायरल

काय म्हणाला रोहित?

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाला फक्त सात आठवडे उरले असून रोहित अजूनही प्रयोग सुरू ठेवण्यास उत्सुक आहे. रोहित म्हणाला, “आम्ही ठरवलं होतं, की आम्ही काही गोष्टी करून बघू आणि जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की काय काम करतं आणि काय नाही. तुम्हाला उत्तरं मिळतील.”

रोहित पुढं म्हणाला, “आम्हाला प्रयत्न करण्याची संधी मिळाल्यास आम्हाला कॉम्बिनेशन वापरून पाहावं लागेल. आम्ही अजूनही गोष्टी करून पाहण्याचा निर्णय घेतला आणि आम्हाला अडचणी आल्या तर काही हरकत नाही. आम्ही प्रयोग करत राहू आणि आम्ही नवीन उत्तरं शोधण्यासाठी घाबरू नये, मग ते फलंदाजी असो किंवा गोलंदाजी.”

हेही वाचा – Asia Cup 2022 : भारत-पाकिस्तान थरारासाठी आख्खा देश सज्ज..! जाणून घ्या मॅचबाबत सर्व काही; फक्त एका क्लिकवर!

विराट कोहली कशी तयारी करत आहे, असं विचारलं असता, रोहितनं नेहमीप्रमाणं त्याचं समर्थन केलं आणि उत्तर दिलं, “मला वाटतं की तो पूर्णपणे चांगल्या फॉर्ममध्ये आहे. एका महिन्याच्या ब्रेकनंतर तो येत आहे.” रोहितसाठीही आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्धचा सामना महत्त्वाचा असेल. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पाकिस्तानशी दोन हात करण्याची ही पहिलीच वेळ असेल. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकानंतर विराटनं कर्णधारपद सोडल्यानंतर रोहितला टी-२० संघाचा कर्णधार बनवण्यात आलं. यानंतर त्याला वनडे आणि कसोटी संघाचीही कमान देण्यात आली.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

Leave a comment