IND vs PAK Asia Cup 2022 : विराट कोहलीनं ठोकलं शतक; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव!

WhatsApp Group

IND vs PAK Virat Kohli : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी आजचा दिवस खूप खास आहे. आज दुबईत रंगत असलेल्या आशिया चषकातील (Asia Cup 2022) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात (IND vs PAK) सर्वांच्या नजरा विराटकडं आहेत. महिनाभराच्या विश्रांतीनंतर त्यानं पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात पाऊल ठेवलं. विराटनं मैदानात पाऊल ठेवताच नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. विराटला १००० दिवसांपेक्षा जास्त दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावता आलेले नाही, पण आज पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराटनं एक अनोखं शतक पूर्ण केलं आहे.

विराट कोहली हा १००वा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना आहे. विशेष म्हणजे कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या तिन्ही फॉरमॅटमध्ये १०० सामने खेळणारा विराट पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून विराट नियमित संघाचा भाग आहे. भारतासाठी ही कामगिरी करणारा तो पहिला आणि एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे, कारण त्याच्याआधी कोणत्याही भारतीय खेळाडूनं ही कामगिरी केलेली नाही.

हेही वाचा – IND Vs PAK Asia Cup 2022 : कॅप्टन रोहित शर्मानं जिंकला टॉस; ‘अशी’ आहे दोन्ही संघांची Playing 11

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने भारतासाठी सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यानं १३२ टी-२० सामने खेळले आहेत, एकदिवसीय सामन्यांमध्येही त्यानं १०० अधिक सामने खेळले आहेत, परंतु त्याच्या कसोटी सामन्यांची संख्या फक्त ४५ आहे. कोहलीची बॅट दोन वर्षांहून अधिक काळ शांत आहे, तरीही त्याची कामगिरी इतर खेळाडूंपेक्षा अनेक पटींनी सरस आहे. नुकताच तो मोहालीत शंभरावा कसोटी सामना खेळला.

विराटची कारकीर्द

विराटने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत आतापर्यंत २३ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये त्यानं १०२ कसोटी सामन्यांमध्ये २७ शतके आणि २८ अर्धशतकांसह आठ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. त्याच्या वनडे सामन्यांची संख्या २६२ आहे, जिथं त्यानं १२ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. त्यात ४३ शतके आणि ६४ अर्धशतके आहेत. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्यानं आतापर्यंत ९९ सामन्यांमध्ये ३३०० हून अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या नावावर ३० अर्धशतकं आहेत.

दोन्ही संघांची Playing 11

भारत – रोहित शर्मा (कप्तान), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.

पाकिस्तान – बाबर आझम (कप्तान), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, फखर अहमद, खुशदल शाह, आसिफ अली, शादाब खान, मुहम्मद नवाज, नसीम शाह, हारिस रौफ, शाहनाझ दहानी.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment