Asia Cup 2022 IND vs PAK : बाबर आझमचं नाणं खणकलंय..! भारताची पहिली बॅटिंग; दोन्ही संघात ‘मोठे’ बदल!

WhatsApp Group

Asia Cup 2022 : आशिया कप २०२२ स्पर्धेमध्ये आज पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामना चाहत्यांची उत्कंठा वाढवत आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत.  यावेळी पाकिस्तानचा कप्तान बाबर आझमनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.  भारतानं आशिया चषकाच्या चालू हंगामात आतापर्यंत चमकदार कामगिरी केली असून गट फेरीतील दोन्ही सामने जिंकले आहेत. पहिल्या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघानं पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला होता. त्यानंतर हाँगकाँगवर ४० धावांनी विजय मिळवला. भारतीय संघ अ गटात अव्वल स्थानी आहे. आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी मोठे बदल केले आहेत.

दोन्ही संघांचा टी-२० रेकॉर्ड

टी-२० इंटरनॅशनलच्या रेकॉर्डवर नजर टाकली तर भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत १० सामने खेळले गेले आहेत. भारतीय संघ ८ सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. म्हणजेच भारतानं ८० टक्के सामने जिंकले आहेत. दुसरीकडे बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला केवळ २ सामने जिंकता आले आहेत. उभय संघांदरम्यान झालेल्या शेवटच्या ५ टी-२० सामन्यांबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघानं ४ तर पाकिस्ताननं एक सामना जिंकला आहे. दोन्ही देशांमधील वादामुळे १५ वर्षांत केवळ १० टी-२० सामने खेळले गेले आहेत.

हेही वाचा – Asia Cup 2022 : फुल्ल गरमा-गरमी..! बॅट्समननं चौकार मारल्यानंतर राशिद खान तापला; पाहा भांडणाचा VIDEO

आशिया कपच्या टी-२० फॉरमॅटमध्ये भारत सरस

आशिया कप दुसऱ्यांदा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवला जात आहे. २०१६मध्ये पहिल्यांदा बांगलादेशमध्ये याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर टीम इंडिया चॅम्पियन बनली होती. त्यानंतरही एका सामन्यात भारतानं पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला होता. या सामन्यात पाकिस्तानचा संघ प्रथम खेळताना केवळ ८३ धावा करू शकला. हार्दिक पांड्यानं ३ बळी घेतले. प्रत्युत्तरात भारतानं ५ गडी गमावून लक्ष्य गाठलं. विराट कोहलीनं ४९ धावा केल्या. अशाप्रकारे टी-२० आशिया कपमध्ये पाकिस्तानच्या संघाला आतापर्यंत भारताला हरवता आलेलं नाही.

हेही वाचा – टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचं कार अपघातात निधन

दोन्ही संघांची Playing 11

भारत – केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक हुडा, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.

पाकिस्तान – मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, खुशदिल शाह, इफ्तिखार अहमद, शादाब खान, आसिफ अली, मोहम्मद नवाज, हारिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment