Asia Cup 2022 Super 4 Schedule : आशिया कप टी-२० स्पर्धेचे साखळी सामने संपले आहेत. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि श्रीलंका या संघांनी सुपर ४ मध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. हे चार संघ आता विजेतेपदासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसणार आहेत. पाकिस्ताननं शुक्रवारी अखेरच्या साखळी सामन्यात हाँगकाँगचा मोठ्या फरकानं पराभव करून सुपर ४ मध्ये आपलं स्थान पक्कं केलं. आठ दिवसांत भारत आणि पाकिस्तानचे संघ (IND vs PAK) ४ सप्टेंबरला आमनेसामने येणार आहेत. याआधी, दोन्ही संघ २८ ऑगस्टला ग्रुप स्टेजमध्ये खेळले, ज्यामध्ये भारतानं विजय मिळवला होता.
कधी, कुठं, कशी बघायची मॅच?
टीम इंडियानं आशिया कपच्या साखळी सामन्यांमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सलग चौथ्यांदा पराभव केला. आता पुन्हा दोन्ही संघ भिडणार आहेत. भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध सलग पाचवा विजय नोंदवण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडं, बाबर आझमच्या कंपनीला पराभवाचा बदला घ्यायचा आहे. अशा स्थितीत क्रिकेटप्रेमींना हाय व्होल्टेजचा सामना पाहायला मिळू शकतो. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप सुपर ४ सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केलं जाईल. Disney+hotstar या अॅपवर हा सामना तुम्ही लाइव्ह पाहू शकता.
Time for Ind vs Pak 🍿🤩🥳#AsiaCup2022 #INDvPAK #PAKvHK pic.twitter.com/XllIACYiPy
— RVCJ Media (@RVCJ_FB) September 2, 2022
सुपर ४ मध्ये ६ सामने
सुपर ४ मध्ये एकूण ६ सामने खेळवले जाणार आहेत. अव्वल दोन संघांमध्ये अंतिम सामना खेळवला जाईल. भारतीय संघाने अ गटात अव्वल स्थानावर सुपर ४ मध्ये प्रवेश केला आहे. टीम इंडियानं पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला होता, तर दुसऱ्या सामन्यात त्यांनी हाँगकाँगचा ४० धावांनी पराभव केला होता. दुसऱ्या क्रमांकावर राहून पाकिस्तानचा संघ एक विजय आणि एक पराभवासह सुपर ४ मध्ये पोहोचला आहे. अफगाणिस्ताननं ब गटातून दोन्ही सामने जिंकून सुपर ४ मध्ये प्रवेश केला, तर श्रीलंकेनं बांगलादेशचा पराभव करत सुपर ४ मध्ये प्रवेश केला.
Getting into the #AsiaCup2022 Super Four groove 👌 👌#TeamIndia pic.twitter.com/VMcyG9ywQ5
— BCCI (@BCCI) September 2, 2022
सुपर ४ मधील सामने –
- ३ सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
- ४ सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान
- ६ सप्टेंबर – भारत विरुद्ध श्रीलंका
- ७ सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान
- ८ सप्टेंबर – भारत विरुद्ध अफगाणिस्तान
- ९ सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान
- ११ सप्टेंबर – फायनल
(सर्व सामने सायंकाळी साडेसातपासून खेळवले जातील)