Asia Cup 2022: मॅचपूर्वी रोहित शर्माचा ‘तो’ सल्ला ऐकून बाबर आझम लाजला..! VIDEO व्हायरल

WhatsApp Group

Rohit Sharma and Babar Azam : आज म्हणजेच २८ ऑगस्ट रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तानचे (IND vs PAK) खेळाडू एकमेकांवर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसणार आहेत. आशिया चषक २०२२ (Asia Cup 2022) मध्ये, दोन्ही संघ त्यांच्या पहिल्याच सामन्यात आमनेसामने येणार आहेत आणि सर्वांच्या नजरा या हाय-व्होल्टेज सामन्यावर आहेत. मात्र सामन्यापूर्वी दोन्ही संघांमधील वातावरण खूपच मैत्रीपूर्ण दिसत असून भारत-पाकिस्तानचे खेळाडू अनेकदा एकमेकांशी गप्पा मारताना समोर आले. अशीच एक भेट रोहित शर्मा आणि बाबर आझम या दोन कर्णधारांमध्ये झाली. रोहितनं असा काही सल्ला दिला, ज्यावर बाबरला हसू आवरता आलं नाही.

आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी दोन्ही संघ दुबईतील आयसीसी क्रिकेट अकादमीमध्ये सराव करत आहेत. दोन्ही संघ त्यांच्या चाहत्यांना आणि एकमेकांनाही भेटत आहेत. बाबर आझम आणि विराट कोहली यांच्या भेटीनं आधीच चांगलं वातावरण तयार झालं होतं. आता रोहितही बाबरला भेटला आहे.

हेही वाचा – Asia Cup 2022 : भारत-पाकिस्तान थरारासाठी आख्खा देश सज्ज..! जाणून घ्या मॅचबाबत सर्व काही; फक्त एका क्लिकवर!

रोहितनं बाबरला कोणता सल्ला दिला?

पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं शनिवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवर बाबर आणि रोहितच्या भेटीचा व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये दोघांमध्ये खूप चर्चा झाली आणि दोघे खूप हसताना दिसले. या हसण्या-बोलण्यामध्येच रोहितनं असे बाबरला लग्न करण्याचा सल्ला दिला, ज्यावर बाबर लाजून हसला आणि म्हणाला, ”मी सध्या असं काही करणार नाही.” भारत-पाकिस्तान संघामध्ये होणाऱ्या मॅचकडं सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. दुबईच्या मैदानावरच गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकात पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाची परतफेड करण्यावर भारतीय संघाचं लक्ष असेल.

हेही वाचा – Asia Cup 2022 : मॅचआधीच विराटनं दाखवला मोठेपणा! बाबर आझमबाबत म्हणाला, “तो जगातला…”

पाकिस्तानविरुद्ध भारताचा मजबूत रेकॉर्ड

रोहितसाठीही आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्धचा सामना महत्त्वाचा असेल. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पाकिस्तानशी दोन हात करण्याची ही पहिलीच वेळ असेल. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकानंतर विराटनं कर्णधारपद सोडल्यानंतर रोहितला टी-२० संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. यानंतर त्याला वनडे आणि कसोटी संघाचीही कमान देण्यात आली. २००८ ते २०१८ या कालावधीत दहा वर्षात आशिया कपमध्ये भारताला पाकिस्तानकडून फक्त एकदाच पराभव पत्करावा लागला आहे. २०१४ मध्ये मीरपूर येथे झालेल्या आशिया चषकाच्या सामन्यात पाकिस्ताननं भारताचा एक गडी राखून पराभव केला होता. शाहीद आफ्रिदीनं अश्विनच्या गोलंदाजीवर सलग दोन षटकार ठोकत पाकिस्तानला एका विकेटने रोमांचक विजय मिळवून दिला होता.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment