IND vs PAK : जोशा जोशात घातला घोळ..! टॉसदरम्यान शास्त्री मास्तरांचा ‘मोठा’ गोंधळ; VIDEO व्हायरल

WhatsApp Group

Asia Cup 2022 : प्रदीर्घ काळ भारतीय संघाचं प्रशिक्षकपद भूषवल्यानंतर रवी शास्त्री आपल्या जुन्या कामावर म्हणजेच ब्रॉडकास्टरच्या भूमिकेत परतले आहेत. ते कॉमेंट्रीही करत आहेत आणि टॉसच्या दरम्यान मैदानातही दिसत आहेत. रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक २०२२ सामन्यात नाणेफेक सुरू असताना शास्त्री अँकरच्या भूमिकेत होते, पण इथं त्यांनी मोठा गोंधळ केला. आता या कारणावरून शास्त्री यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. आशिया चषकाच्या चालू हंगामात भारत आणि पाकिस्तान मागच्या आठ दिवसांत दुसऱ्यांदा आमनेसामने आले आहेत. हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आठवड्यातून दोनदा भिडण्याची ही पहिलीच वेळ आहे. दुबईतच साखळी फेरीत खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला.

नाणेफेकीच्या वेळी रोहितनं नाणं हवेत उंचावलं आणि बाबरनं टेल्स असं कॉल दिला. पण शास्त्रींनी लाइव्ह मॅचमध्ये हेड्स असं म्हटलं. नाणं जमिनीवर पडल्यानंतर सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी नाणेफेक कोणी जिंकली हे स्पष्ट केलं. पाकिस्तानच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा – Asia Cup 2022 IND Vs PAK : बाबर आझमचं नाणं खणकलंय..! भारताची पहिली बॅटिंग; दोन्ही संघात ‘मोठे’ बदल!

शास्त्री त्यांच्या उत्साही शैलीसाठी ओळखले जातात आणि नाणेफेकच्या वेळी त्यांची उत्साही शैली पुन्हा एकदा दिसून आली. शास्त्रींनी दोन्ही कर्णधारांची ओळख त्यांच्या ओळखीच्या शैलीत अतिशय भारदस्त आवाजात करून दिली. शास्त्रींची ही शैली पाहून सामनाधिकार्‍यांसह दोन्ही कर्णधारांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.

पाकिस्ताननं जिंकली नाणेफेक

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्ताननं आपल्या संघात बदल केला आहे. शाहबाज दहानीच्या जागी मोहम्मद हसनैन संघात आला आहे. त्याचबरोबर भारतानंही तीन बदल केले आहेत. आवेश खानच्या जागी रवी बिश्नोई, दुखापतग्रस्त रवींद्र जडेजाच्या जागी दीपक हुडाचा संघात समावेश करण्यात आला आहे. २८ ऑगस्ट रोजी झालेल्या भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला होता. भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्ताननं हाँगकाँगचा वाईट पद्धतीनं पराभव केला होता.

दोन्ही संघांची Playing 11

भारत – केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक हुडा, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.

पाकिस्तान – मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, खुशदिल शाह, इफ्तिखार अहमद, शादाब खान, आसिफ अली, मोहम्मद नवाज, हारिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

 

 

Leave a comment