IND vs PAK : पत्रकारांसमोर ‘Sexy’ शब्द बोलण्यापासून द्रविडनं स्वत:ला रोखलं; काय घडलं? पाहा VIDEO

WhatsApp Group

Asia Cup 2022 : भारत आणि पाकिस्तानचा (IND vs PAK) संघ रविवारी (४ सप्टेंबर) समोरासमोर येण्यासाठी सज्ज झाला आहे. आशिया चषक २०२२ स्पर्धेमध्ये, दोन्ही संघांमध्ये यापूर्वीच एक सामना खेळला गेला आहे, ज्यामध्ये भारतानं बाजी मारली. हार्दिक पंड्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतानं पाकिस्तानचा ५ विकेट्सनं पराभव केला. मात्र, पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांसमोर भारतीय आघाडीच्या फळीतील कमकुवतपणा उघड झाला. पाकिस्तानकडून पदार्पण करणाऱ्या १९ वर्षीय नसीम शाहनं केएल राहुलला बोल्ड केले.

दुसरीकडें कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली धावा काढण्यासाठी धडपडताना दिसले. आज होणाऱ्या भारत-पाक सामन्यापूर्वी द्रविड पत्रकार परिषदेत पोहोचला. पत्रकारांच्या पाकिस्तानी गोलंदाजीच्या प्रश्नावर तो असं काही बोलला की सगळ्यांनाच हसू आलं. द्रविड त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेकदा गंभीर मुद्रेत दिसलाय. मात्र टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर या महान फलंदाजाच्या व्यक्तिमत्त्वातील मजेशीर पैलूही पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा – Asia Cup 2022 IND Vs PAK : बदल्याच्या मूडमध्ये असलेल्या पाकिस्तानला भारत पुन्हा धुणार?

कोणता होता तो शब्द?

दुबईतील सामन्यापूर्वी जेव्हा द्रविडला दोन्ही संघांच्या गोलंदाजीबाबत विचारण्यात आलं तेव्हा तो सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही गोष्टी म्हणाला. द्रविड म्हणाला, “मला एक शब्द इथं वापरायचा होता, पण तो वापरू शकत नाही.” यानंतर द्रविड स्वतःच हसायला लागला आणि म्हणाला, “माझ्या मनात शब्द आहे, तोंडातून बाहेर पडणार होता, पण तो आता वापरू शकत नाही. मी जो शब्द बोलायचा प्रयत्न करत आहे तो चार अक्षरांचा शब्द आहे जो ‘S’ नं सुरू होतो, पण ते ठीक आहे. आम्ही ग्लॅमरस दिसत नाही, पण आमच्याकडं असे खेळाडू आहेत जे निकाल देतात.” द्रविडला SEXY शब्द म्हणायचा होता, पण आपल्या स्वभावामुळं तो शब्द बोलू शकला नाही.

याशिवाय राहुल द्रविडनं भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचाही बचाव केला. त्यानं स्पष्टपणे सांगितलं, की कोहलीनं किती धावा केल्या याला महत्त्व नाही. त्याच्या मते, टी-२० क्रिकेटमधील एक छोटी खेळीही सामन्याचा मार्ग बदलू शकते. त्याचवेळी ऋषभ पंतबाबत द्रविड म्हणाला, की विकेटकीपर म्हणून तो टीम इंडियाचा पहिला पर्याय नाही. खेळपट्टी आणि परिस्थिती लक्षात घेऊन खेळाडूची निवड केली जाईल.

हेही वाचा – Asia Cup 2022 : हाँगकाँगच्या टीमवर हसताय? त्यांचा स्ट्रगल वाचून डोळ्यात पाणी येईल! कुणी डिलिव्हरी बॉय, तर कुणी…

दोन्ही संघ

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.

पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, उस्मान कादिर, मोहम्मद हसनैन, हसन अली.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment