Asia Cup 2022 : विराट कोहलीनं क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये फलंदाज म्हणून मोठं नाव कमावलं आहे. फलंदाज म्हणून त्याची आकडेवारी अविश्वसनीय आहे. विराटनं तिन्ही फॉरमॅटमध्ये जवळपास ५०च्या सरासरीनं धावा केल्या आहेत, परंतु अनेक प्रसंगी गोलंदाजीही केली आहे. आता त्यानं आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये साडेसहा वर्षानंतर गोलंदाजी केली आहे. आशिया कप २०२२ (Asia Cup 2022) स्पर्धेत हाँगकाँगविरुद्ध बुधवारी (IND vs HK) सामन्यात विराटनं गोलंदाजी केली.
३३ वर्षीय विराटनं प्रथम आपलं ३१वं टी-२० अर्धशतक साकारलं आणि नंतर हाँगकाँगविरुद्ध डावाचे १७वं षटक टाकलं. या षटकात त्यानं ६ धावा दिल्या, त्याला एकही विकेट मिळाली नाही. शेवटच्या वेळी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये विराट कोहलीनं २०१६च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये गोलंदाजी केली होती. मुंबईत वेस्ट इंडिजविरुद्ध विराटनं गोलंदाजी केली होती.
३१ मार्च २०१६ रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात, विराटनं कॅरेबियन सलामीवीर जॉन्सन चार्ल्सला त्याच्या स्पेलच्या पहिल्याच चेंडूवर बाद केलं, पण त्या सामन्यानंतर त्यानं आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये कधीही गोलंदाजी केली नाही. एकूणच, आतापर्यंत त्यानं १०१ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत. यात त्यानं १२ वेळा गोलंदाजी केली आहे आणि ४ विकेट्स घेतल्या आहेत, २९ ऑक्टोबर २०११ रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर त्यानं इंग्लंडविरुद्ध १३ धावा देऊन एक बळी घेतला होता.
Virat Kohli bowling after 7 years #ViratKohli𓃵 #Viral #Trending #indiavshongkong #INDvHK #INDvHKG #viratbowling #kingkohli #Kohli #TheLastofUsPartI #MONEY pic.twitter.com/7LWZ24GC5N
— VisualsBy VM (@VisualsByVM) August 31, 2022
हेही वाचा – सारा तेंडुलकर नाही, सारा अली खानसोबत फिरतोय शुबमन गिल? VIDEO व्हायरल!
विराट कोहलीनं ६ महिने आणि ११ डावांनंतर अर्धशतक झळकावलं आहे. विराटनं शेवटची वेळ १८ फेब्रुवारी २०२२ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध अर्धशतक झळकावलं होतं. त्या सामन्यात त्यानं ४१ चेंडूत ५२ धावा केल्या होत्या. कोहलीनं ३२ महिन्यांनंतर टी-२० क्रिकेटमध्ये सलग ३ सामन्यात १० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. शेवटच्या वेळी जानेवारी २०२० मध्ये सलग ३ सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून १० पेक्षा जास्त धावा आल्या.
The King is in bowling @imVkohli 𓃵 #KingKohli | #ViratKohli𓃵 #INDvsHK #INDvHKG #INDvHK pic.twitter.com/Lh566ZEqgr
— KiNG 𓃵 (@KiNGUSMANVK18) August 31, 2022
असा रंगला सामना…
अफगाणिस्ताननंतर भारत आशिया चषक २०२२ स्पर्धेत टॉप-४ मध्ये स्थान मिळवणारा दुसरा संघ ठरला आहे. भारतीय संघानं त्यांच्या दुसऱ्या साखळी सामन्यात हाँगकाँगचा ४० धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियानं २० षटकांत २ गडी गमावून १९२ धावा केल्या. भारताकडून सूर्यकुमार यादवनं सर्वोत्तम खेळी खेळली. त्यानं २६ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीनं नाबाद ६८ धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट २६१ होता. विराट कोहली ४४ चेंडूत ५९ धावा करून नाबाद राहिला. विराटनं या खेळीत १ चौकार आणि ३ षटकार लगावले. केएल राहुलनं ३९ चेंडूत ३६ तर कर्णधार रोहित शर्मानं १३ चेंडूत २१ धावा केल्या.