Asia Cup 2022 IND vs AFG : विराटनं SIX मारून ठोकलं शतक..! संपवली १०२० दिवसांची प्रतीक्षा; पाहा तो क्षण!

WhatsApp Group

Asia Cup 2022 : टीम इंडियाचा महान फलंदाज विराट कोहलीनं अखेर शतक झळकावलं आहे. आपल्या ७०व्या ते ७१व्या आंतरराष्ट्रीय शतकासाठी त्यानं १०२० दिवस वाट पाहिली. ही प्रतीक्षा लांबत चालली होती, पण आज ८ सप्टेंबर २०२२ रोजी त्यानं शतक झळकावलं. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील हे पहिलं शतक असलं तरी विराटचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हे ७१वे शतक आहे.

विराट कोहलीचं शेवटचं आंतरराष्ट्रीय शतक २३ नोव्हेंबर २०१९ रोजी आलं होतं, जेव्हा तो बांगलादेशविरुद्ध पिंक बॉल कसोटी सामन्यात शतक झळकावण्यात यशस्वी झाला होता. त्याचवेळी विराटनं आशिया चषक २०२२ च्या सुपर ४ सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध ५३ चेंडूत ११ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीनं शतक पूर्ण केले. यादरम्यान त्याचा स्ट्राइकरेट १८८.६८ होता. विराटनं या सामन्यात १२ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद १२२ धावा केल्या. या सामन्यात विराट सलामीला आला आणि त्यानं शेवटपर्यंत फलंदाजी केली.

विराटचं शतक कुणाला समर्पित?

”एक व्यक्ती जी नेहमी माझ्या मागं उभी असते ती म्हणजे अनुष्का. मी नेहमी स्वत:ला भाग्यवान समजतो. हे शतक खास तिला आणि आमच्या मुलीला समर्पित आहे”, असं विराटनं खास शतकानंतर म्हटलं. अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा विराट कोहली हा पहिला खेळाडू आहे. त्याच्या आधी, अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या ल्यूक राइटची होती, ज्याने नाबाद ९९ धावा केल्या होत्या. याशिवाय विराट आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे.

विराट चौथा भारतीय

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा विराट हा भारताचा सहावा फलंदाज आहे. विराटपूर्वी सुरेश रैना, केएल राहुल, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि दीपक हुडा यांनी भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये शतके झळकावली होती. यासह विराट कोहली हा तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके करणारा रोहित शर्मा, केएल राहुल, सुरेश रैना यांच्यानंतर चौथा भारतीय ठरला आहे.

दोन्ही संघांची Playing 11

भारत : केएल राहुल (कर्णधार), ऋषभ पंत, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, दीपक हुडा, अक्षर पटेल, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, दीपक चहर.

अफगाणिस्तान : हजरतुल्ला झझाई, रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम जद्रान, नजीबुल्ला झादरान, मोहम्मद नबी (कर्णधार), करीम जनात, राशिद खान, अजमातुल्ला उमरझाई, मुजीब उर रहमान, फरीद अहमद मलिक, फझलहक फारुकी.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment