IND vs AFG : “हा शुद्ध हिंदीत बोलतोय..!”, रोहित शर्माचा प्रश्न ऐकून विराट अवाक्; पाहा मुलाखतीचा VIDEO

WhatsApp Group

Rohit Sharma Interviews Virat Kohli : आशिया कप २०२२ (Asia Cup 2022) स्पर्धेमध्ये विराट कोहलीनं अतिशय खास आणि दीर्घ प्रतीक्षेनंतर अफगाणिस्तानविरुद्ध (IND vs AFG) आपलं ७१ वं शतक झळकावले आहे. जवळपास तीन वर्षांनंतर त्याला शतक झळकावण्यात यश आलं आहे. टी-२० फॉरमॅटमध्ये शतक करण्याची त्याला किमान अपेक्षा होती. अफगाणिस्तानविरुद्धच्या आशिया कप सामन्यात त्यानं १२२ धावांची संस्मरणीय खेळी खेळली आणि त्यानंतर संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मानं त्याची मुलाखत घेतली.

विराट-रोहितची मुलाखत?

विराट कोहलीनं १०२० दिवसांनंतर पहिलं आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं आहे. त्याच्या ७१व्या शतकानं त्याला सर्वाधिक शतकांच्या यादीत महान रिकी पाँटिंगच्या बरोबरीत आणलं. सचिन तेंडुलकर अजूनही १०० आंतरराष्ट्रीय शतकांच्या पुढे आहे. शतक झळकावल्यानंतर विराटनं कोहलीला विचारलं, ”पहिली गोष्ट तुला खूप खूप शुभेच्छा, ७१वं शतकासाठी भारत आणि तूसुद्धा वाट पाहत होता. तू जी खेळी खेळलीस तिथं तुला अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या. तू सुंदर फटके खेळलेसं. तु तुझ्या इनिंगविषयी सांग. तू कशी सुरुवात केलीस, काय केलंस, कशी भावना होती?”

हेही वाचा – १७ वर्षीय मुलीवर बलात्कार प्रकरणी IPL ‘स्टार’ क्रिकेटरचं निलंबन! म्हणाला, “माझ्या देशात…”

विराट म्हणाला…

रोहितनं ही चर्चा एकदम शुद्ध हिंदीत केली. त्यानंतर विराटनं कॅमेऱ्यासमोर म्हटलं, ”हा इतकं शुद्ध हिंदी बोलतोय माझ्यासमोर”, त्यावर रोहित म्हणाला, मी इंग्रजी-हिंदीत बोलणार होतो, पण चांगलं येतंय हिंदी त्यामुळं विचारलं.” यादरम्यान दोघेही हसू लागले. विराट नंतरम्हणाला, “ मी या शतकाची टी-२० फॉरमॅटमधून अपेक्षा करत नव्हतो. कोणालाच अशी अपेक्षा नव्हती. गेल्या अडीच वर्षांनी मला खूप काही शिकवलं. मी एका महिन्यात ३४ वर्षांचा होणार आहे. त्यामुळे त्या आता भूतकाळातील गोष्टी आहेत.”

हेही वाचा – Asia Cup 2022 IND Vs AFG : विराटनं SIX मारून ठोकलं शतक..! संपवली १०२० दिवसांची प्रतीक्षा; पाहा तो क्षण!

रोहित शर्मा मुंबईकर असल्यामुळं मुंबईकरांना शुद्ध हिंदीत बोलता येत नसल्याचं एका मुलाखतीत सांगितलं होतं. म्हणूनच विराटनं त्याचं हिंदी ऐकून अवाक् झाला. विराट कोहलीच्या या शानदार शतकाच्या जोरावर भारतानं या सामन्यात १०१ धावांनी विजय मिळवला.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment